देशातील या राज्यांमध्ये महिलांना मासिक पाळीची भगारी रजा ; महाराष्ट्रातही महिला कर्मचाऱ्यांची मागणी !

Spread the love

E-Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ women leave in period time news ] : महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळी दरम्यान देशातील काही राज्यांमध्ये पगारी रजा देण्यात येते . आत्तापर्यंत देशात असे तिन राज्य होते , आता यांमध्ये ओडीसा राज्याची भर पडल्याने देशात महिलांना मासिक पाळी दरम्यान सुट्टी देणारे एकुण 4 राज्य झाले आहेत .

या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यांमध्ये देखिल महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळी दरम्यान पगारी रजा देण्याची मागणी होत आहेत . देशांमध्ये सध्य स्थितीत बिहार , केरळ व सिक्कीम या राज्य सरकारमार्फत सरकारी तसेच खाजगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळी दरम्यान पगारी रजा देण्याचे धोरण लागु करण्यात आलेले आहेत .

बिहार राज्य सरकारने सन 1992 मध्ये मासिक पाळी रजा अधिनियम धोरण लागु करण्यात आले असून या अधिनियम अंतर्गत महिलांना दर महिन्याला 02 दिवसांची मासिक पाळी रजा देण्यात येते , त्याचबरोबर केरळ राज्य सरकारने सन 2023 मध्ये कायदा मंजूर करुन मासिक पाळी दरम्यान रजा देण्याची तरतुद करण्यात आलेली आहे .

तर सिक्कीम राज्य सरकारच्या हायकोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार रजिस्ट्रीमध्ये कार्यरत सर्व महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळी दरम्यान 2-3 दिवस सुट्टी देण्याची तरतुद करण्यात आलेली आहे .

 तर आता यांमध्ये ओडीसा राज्य सरकारच्या उपमुख्यमंत्री प्रवती परिदा यांच्या पुढाकाराने सरकारी व खाजगी क्षेत्रांमध्ये कार्यरत महिलांना मासिक पाळी दरम्यान एक मासिक पाळीची रजा देण्याची तरतुद करण्यात आलेली आहे , सदरची रजा ही पगार रजा असून ही एक प्रकारची ऐच्छिक रजा असणार आहे .

या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील महिला कर्मचाऱ्यांकडून मासिक पाळी दरम्यान पगारी रजेची मागणी करण्यात येत आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment