कर्मचाऱ्यांना महत्वपूर्ण : वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून “या” माध्यमाचे आदेश पाळणे बंधनकारक नाहीत .

Spread the love

E- marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ whatsapp adesha to employee from officers not legal ] : वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून आदेश दिले जाते,  सदर आदेश कर्मचाऱ्यांनी पाळणे बंधनकारक असणार आहेत . कारण सदरच्या आदेश अधिकृत नसल्याने त्यावर होणारी कार्यवाही बेकायदेशीर असणार आहे . या संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे माहितीच्या अधिकारामध्ये ,  प्रश्न विचारण्यात आला होता . सदर प्रश्नावर सामान्य प्रशासन विभागाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात येणारे आदेश कर्मचाऱ्यांनी पाळणे बंधनकारक नसल्याचे स्पष्ट केले आहे .

यामध्ये प्रामुख्याने व्हाट्सअप व अन्य इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना आदेश देणे बेकायदेशीर असून , सध्या राज्यामध्ये शासकीय , निमशासकीय त्याचबरोबर खाजगी संस्थांमध्ये सर्रासपणे सदर प्रसार माध्यमाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना आदेश दिले जाते , जे की पाळणे कर्मचाऱ्यांना बंधनकारक नसल्याची स्पष्ट केली आहे .

सद्यस्थितीमध्ये बहुतांश वेळा प्रसार माध्यमांचा वापर करून कर्मचाऱ्यांना आदेशाचे पालन करण्याचे निर्देश दिले जाते,  तसेच आदेशाची अंमलबजावणी न केल्यास वरिष्ठांकडून कार्यवाही देखील केली जाते . यामुळे राज्यातील अनेक कर्मचारी सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आदेशाच्या अनुसरून काम करणे ऐच्छिक स्वरूपाचे असणार आहे .

सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्मचारी,  अधिकाऱ्यांचा स्वतंत्र ग्रुप करून कामांची देवाण-घेवाण देखील केली जाते , यामध्ये प्रामुख्याने व्हाट्सअप चा अधिक वापर केला जातो . यामध्ये आरोग्य कर्मचारी, महसूल शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी , जिल्हा परिषद इत्यादी खात्यामध्ये व्हाट्सअप च्या माध्यमातून बऱ्याच वेळा अधिकाऱ्यांकडून संदेश देऊन माहिती मागविण्याच्या किंवा संपर्क करण्याचा प्रकार आहे .

परंतु काही तांत्रिक दोष तसेच नेटवर्क आधी बाबीमुळे सदर प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आलेल्या आदेशाला प्रतिउत्तर देण्यास विलंब झाली असल्यास , सदर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही केले जाते हे बेकायदेशीर असून , सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेले आदेश पाळणे कर्मचाऱ्यांना बंधनकारक असणार नाहीत , असे राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहेत . यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment