समुद्रामध्ये वादळाने घेतला रौद्र रूप ; तब्बल 80 वर्षांमध्ये पुन्हा राज्यात धोक्याचा इशारा !

Spread the love

E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ vadal update news see detail ] : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार , समुद्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वादळाची स्थिती निर्माण झाली असून , सदर वादळाचा परिणाम देशातील गुजरात व महाराष्ट्रा राज्याला होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे .

सदर वादळामुळे गुजरात मध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे , तर राज्यातील किनारी भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे . त्याचबरोबर राज्यातील विदर्भातील गडचिरोली , चंद्रपूर भागामध्ये अति जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे . त्याचबरोबर कोकण , मराठवाडा भागामध्ये देखील पावसाचा मोठा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे .

समुद्रातून येतोय मोठा वादळ : सध्या समुद्रामधून रौद्ररूप धारण करून वादळ गुजरात , महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकत असल्याची माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे . यामध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गुजरातमध्ये पावसाने जोरदार सुरुवात केली आहे . तर सदर वाऱ्यामुळे गुजरात मध्ये चक्रीवादळ निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे . समुद्रामध्ये निर्माण झालेल्या या वादामुळे किनारी भागातील जनतेला सुरक्षित स्थळी हलवण्यात आली आहेत .

कारण अशा प्रकारचे चक्रीवादळ सुमारे 80 वर्षांमध्ये पहिल्यांदाच आले असल्याची माहिती देण्यात आली आहे , या चक्रीवादळाचा तडाखा गुजरात राज्याला तर महाराष्ट्रातील काही गुजरात लगतच्या जिल्ह्यांना होणार आहे .

हे पण वाचा : जनतेच्या विकासासाठी राज्यात विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी ; जाणून घ्या सविस्तर योजना .

सदर चक्रीवादळाच्या अनुषंगाने राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी तर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . यामध्ये प्रामुख्याने गुजरात राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे , तर राज्यामध्ये सदर चक्रीवादळाचा परिणाम म्हणून दिनांक 2 सप्टेंबर पर्यंत नाशिक , रायगड , सातारा , सांगली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .

शेतकऱ्यांनो नियमित हवामान अंदाज कृषी विषयक माहिती योजना यांची रेग्युलर  अपडेट साठी खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !.

Leave a Comment