NPS पेक्षा UPS आहे फायदेशीर ; निवृत्तीनंतर यूपीएस मध्ये कर्मचाऱ्यांना किती मिळेल पेन्शन ?  समजून घ्या सविस्तर गणित !

Spread the love

E- marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ UPS Pension scheme calculation ] : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन यूनीफाईड पेन्शन स्कीम , ही  राष्ट्रीय पेन्शन स्कीम ( NPS ) ऐवजी लागू केली आहे . तीच पेन्शन योजना राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली आहे . याबाबत राज्य शासनाकडून अधिकृत निर्णय घेण्यात आला आहे . राज्य शासनाने काल दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी केंद्र सरकारने लागू केलेली “एकीकृत निवृत्तीवेतन योजना”  जशाच्या तसे लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे . तसेच सदर पेन्शन योजना लागू केल्यानंतर येणाऱ्या अतिरिक्त खर्चास देखील राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे .

सदर यूपीएस पेन्शन  (UPS ) योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर  एखादा कर्मचारी 25 वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर पेन्शन घेण्यासाठी पात्र ठरेल त्यास मागील बारा महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% इतकी पेन्शन यूपीएस मध्ये किमान पेन्शन हमीची तरतूद करण्यात आलेली आहे , नेमके किती पेन्शन मिळणार यासंदर्भात सविस्तर आकडेवारी पुढील प्रमाणे जाणून घेऊयात .

जर यूपीएस प्रणालीमध्ये कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असल्यास त्याच्या कुटुंबीयाला 60 टक्के पेन्शनची रक्कम देण्याची तरतूद त्याचबरोबर पेन्शन सोबत महागाई रिलीफ म्हणजेच डीआर (DR ) देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे .

यूपीएस प्रणालीमध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना प्रमाणे कर्मचाऱ्यांचे 10%  व त्यात केंद्र सरकारची 18.5 टक्के योगदान असणार आहे . म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS )मध्ये सरकारची योगदान 14 टक्के वरून 18.5% इतके वाढवण्यात आले आहे . यामुळे कर्मचाऱ्यांच्या यूपीएस खात्यामध्ये एकूण 28.5% इतकी रक्कम जमा होणार आहे सदर जमा रकमेवरच कर्मचाऱ्यांना यूपीएस मध्ये पेन्शन दिली जाणार आहे .

म्हणजेच 25 वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना शेवटच्या बारा महिन्याच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% रक्कम इतकी पेन्शन म्हणून दिले जाणार आहे , सदर पेन्शन सोबत महागाई भत्ता सवलत देखील दिली जाणार असल्याने सदर पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनेपेक्षा अधिक लाख मिळणार आहे . त्याचबरोबर ज्यांचे किमान पेन्शन 10000 पेक्षा कमी येत असेल अशांना किमान दहा हजार रुपये पेन्शनची तरतूद सदर यूपीएस मध्ये करण्यात आली आहे .

Leave a Comment