युनिफाईड पेन्शन योजनेत पेन्शन नेमकी कशी मिळणार ? मंत्रीमंडळाची मंजुरीनंतर , कर्मचाऱ्यांस पेन्शनचा पर्याय निवडण्याची संधी ..

Spread the love

E-marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ unified pension scheme ] : केंद्र सरकारने दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी मंत्रीमंडळ बैठक आयोजित करुन सदर बैठकीमध्ये , केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना युनिफायईड पेन्शन योजनेला मंजुरी देण्यात आली आहे . सदर युनिफाईड पेन्शन योजनांमध्ये नेमकी कशी पेन्शन मिळणार , याबाबत सदर पेन्शन योजनेची काही ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे पाहुयात ..

01.जर एखाद्या कर्मचाऱ्यांने किमान सेवा ही 25 वर्षे केल्यास , सदर कर्मचाऱ्यांस सेवानिवृत्तीच्या पुर्वी मिळणाऱ्या शेवटच्या 12 महिन्यांच्या मुळ वेतनांच्या किमान 50 टक्के इतकी पेन्शन मिळणार आहे , यांमध्ये महागाई भत्ताचा अंतर्भाव असेल कि नाही , याबाबत अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाहीत .

02.सरकारच्या योगदानांमध्ये वाढ : सदर पेन्शन योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांचे 10 टक्के योगदार कायम ठेवण्यात आले असून , यांमध्ये सरकारच्या योगदान हे 14 टक्के वरुन 18 टक्के इतका करण्यात आला आहे .

हे पण वाचा : दि.04 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री यांच्यासोबत कर्मचारी संघटनेच्या झालेल्या बैठकीत , राज्य अधिकारी – कर्मचारी करिता मोठ्या घोषणा !

03.किमान सेवाकरीता किमान पेन्शनची तरतुद : जर एखाद्या कर्मचाऱ्यांने केवळ 10 वर्षे सेवा करुन नोकरी सोडल्यास तर सदर कर्मचाऱ्यास किमान 10,000/- रुपये इतकी पेन्शन देण्याची तरतुद करण्यात आलेली आहे .

04.सदरची युनिफाईड पेन्शन योजना ही NPS धारक कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आलेली आहे , याकरीता कर्मचाऱ्यांना NPS अथवा UPS पेन्शन योजनांपैकी एकाची निवड करण्याचा पर्याय असणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment