सरकारी कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये सुरक्षा देणारा न्यायालयाचा महत्वपुर्ण निर्णय ..

Spread the love

E-marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ unfit employee nirnay from mat ] : सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा देणारा न्यायालयांकडुन अत्यंत महत्वपुर्ण निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

एखादा कर्मचारी सेवेत असताना , अनफिट झाला असेल तर त्यास सेवेतुन काढुन टाकता येत नाहीत , तर सदरचा कर्मचाऱी हा सेवेत असून त्यास सेवानिवृत्ती पर्यंतचे सर्व लाभ देणे बंधनकारक ठरणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत . याबाबत मुंबई मॅटचे न्यायिक सदस्य श्री.ए.पी.कुऱ्हेकर यांनी दिनांक 09 जुन रोजीच्या निर्णयांमध्ये सदर आदेश काढण्यात आला आहे .

सदरचे प्रकरण हे सोलापुर येथील चनबसय्या संगमठ यांच्या बाबतीतील असून ते सदरबाजार या पोलिस ठाण्यांमध्ये नायक या पदावर कार्यरत होते , ते रजेदरम्यान त्यांचा दिनांक 28.10.2022 रोजी अपघात झाला , त्यात त्यांची गंभीर ईजा मुळे काम करता येणे शक्य नसल्याने , त्यांना पोलिस ठाण्यांमध्येच कार्यरत ठेवण्यात आले .

त्यात त्यांना पक्षघाताचा झटका आला , व त्यांना पोलिस प्रशासनांकडून मेडिकल बोर्डाकडे पाठविण्यात आले , त्यात त्यांना अनफिट घोषित करण्यात आले . यावरुन त्यांना पोलिस आयुक्तांनी अनफिट म्हणून सेवेतून काढून टाकण्यात आले . यामुळे संगमठ हे मॅटमध्ये याचिका दाखल केली .

हे पण वाचा : कर्मचाऱ्यांची फेर तपासणी करून कारवाई करणे संदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित ..

यावर मुंबई मॅटने दिलासा देत , पेन्शन नियम 20 ( 4) नुसार सदर कर्मचारी हे निवृत्तीपर्यंत सेवेत आहेत , असे ग्राह्य धरुन तसेच ते 24 तास सेवेत असतात , असे समजुन निवृत्तीपर्यंतचे लाभ देण्याचा मोठा महत्वपुर्ण निर्णय मॅटने दिला आहे . सदर निकालाचा आधार देत इतर प्रकरणांवर देखिल निर्णय घेण्यात येईल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment