E-marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ thakit deyake shasan paripatrak ] : थकित देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत , राज्य शासनांच्या शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या परिपत्रकानुसार , थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीनेच सादर करणेबाबत शासनाचे निर्देश आहेत , त्यानुसार शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आली असून , त्या अनुषंगाने थकीत वेतन देयकाची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आणि सदरचे थकीत देयकास ऑनलाईन प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत महत्वपुर्ण सुचना देण्यात आलेल्या आहेत .
यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , संबंधित मुख्याध्यापक यांनी प्रलंबित वेतन अनुदानाची देयके योग्य ती तपासणी / पडताळणी करुन सदर दाव्यांना मंजूरी घेण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये , लॉगीन वरुन थकीत देयकाची माहिती भरण्याचे तसेच आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तसेच अधिक्षक वेतन पथक व संबंधित शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्याकडे ऑनलाईन प्राप्त झालेली थकीत वेतन अनुदानाची देयके नियमानुसार योग्य ती तपासणी व पडताळणी करुन सदर दाव्यांना ऑनलाईन – मंजूरीकरीता संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे सादर करण्याचे निर्देश आहेत . यांमध्ये थकीत देयके प्रशासकीय मान्यता संदर्भ आदेश ( वैयक्तिक मान्यता / वरिष्ठ / न्यायालयीन आदेश तसेच अनुदानाअभावी थकीत देयके इ. देयके ) ऑनलाईन सुविधा विकसित करुन अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून ऑनलाईन प्राप्त झालेली प्रलंबित वेतन अनुदानाची देयके योग्य ती तपासणी व पडताळणी करुन सदर दाव्यांना शासन निर्णय 15 जुलै 2017 मधील सुचनांनुसार ऑनलाईन प्रशाासकीय मंजूरी संबंधित शिक्षण संचालक यांनी देणे नमुद करण्यात आलेले आहेत . तसेच पवित्रद्वारे नियुक्त असल्यास संस्थेचा आदेश व रुजु अहवालाची प्रत , नियमित वेतनश्रेणी फरक शि.अ शि. उ.स मान्यता व वेतन निश्चिती प्रत जोण्याची नमुद करण्यात आली आहे .
तसेच डिडीओ – 1 स्तरावरुन थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक 25 सप्टेंबर 2024 पर्यंत सुविधा उपलब्ध राहील त्यानंतर सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे शक्य होणार नसल्याचे नमुद करण्यात आले आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.16.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !
- राज्यात या 11 दिवशी पडणार मुसळधार पाऊस ; ” या” जिल्ह्यांना अलर्ट जारी – पंजाबराव यांचा नवा हवामान अंदाज ..
- दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असताना निधन झालेल्या / होणाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सुधारित करणेबाबत महत्वपुर्ण GR .
- पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार बातमीबाबत , राज्य शासनांकडून खुलासा !
- राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ; सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ..