राज्यातील शिक्षकांना दिलासा देणारा शासन निर्णय निर्गमित GR दि.23.08.2024

Spread the love

E- marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ teacher works shasan nirnay gr] : राज्यातील शिक्षकांना दिलासा देणारा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णय नुसार शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या वर्गीकरण संदर्भात माहिती विशद करण्यात आली आहे .

सदर शासन निर्णय नुसार प्राथमिक वर्गाकरिता 200 दिवस व उच्च प्राथमिक वर्गाकरिता 220 दिवस अध्यापन होणे बंधनकारक असणार आहेत , राज्यातील शिक्षक तसेच इतर संबंधित यंत्रणा यांना शैक्षणिक व अशैक्षणिक कामांचे वर्गीकरण करून ते संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती यानुसार पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे .

शैक्षणिक कामे म्हणजे ज्याचा शिक्षण विभागाशी संबंध नाही किंवा अन्य विभाग कडे परंपरागतरित्या जी कामे शिक्षकांना सांगितली जातात , अथवा जी डाटा एन्ट्री तिचा थेट शिक्षकांची संबंध नाही अथवा यासाठी अन्नसाधने वापरून जी पूर्ण केली जाऊ शकतात अशा प्रकारच्या कामांना अशैक्षणिक कामे समजण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहे . त्याचबरोबर ज्या बाबीचा शिक्षण या बाबीशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध आहे अशा सर्व बाबी शैक्षणिक बाबी समजण्यात यावे , तसेच या अनुषंगाने सदर शासन निर्णय मध्ये परिशिष्ट अ येथे शैक्षणिक कामे नमूद करण्यात आलेली आहे. सदर शिक्षक वर्गांनी सदर शैक्षणिक कामे करणे बंधनकारक असणार आहेत.

तसेच शैक्षणिक कामाव्यतिरिक्त परिशिष्ट ब मध्ये नमूद अशैक्षणिक कामे नमूद करण्यात आलेली आहे ,सदर अशैक्षणिक कामे शासनाच्या कोणत्याही  शिक्षकांना बंधनकारक करण्यात येऊ नये असे नमूद करण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा : खुशखबर : सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात 3 टक्के वाढीव महागाई भत्ताचा लाभ ..

अशैक्षणिक कामे: अशैक्षणिक कामामध्ये गावाची स्वच्छता अभियान राबवणे , प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी आवश्यक कामाव्यतिरिक्त  निवडणूक विषयक नियमित चालणारी कामे करणे , इतर विभागाच्या विविध योजनांसाठी विद्यार्थी लाभार्थी म्हणून पहिल्यांदा नोंद केल्यानंतर पुढील वर्गासाठी परत परत नोंदणी करणे , गावातील तंटामुक्ती व इतर समस्यावर सदस्य म्हणून काम करणे.

तसेच इतर संस्था कडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आयोजित करणे, विविध प्रकारची सर्वेक्षणी त्यामध्ये दारिद्र रेषेखालील कुटुंबाची सर्वेक्षण, पशु सर्वेक्षण, शौचालय सर्वेक्षण इत्यादी सर्वेक्षणाची कामे करणे. तसेच शालेय कामकाजाव्यतिरिक्त अन्य विभागांची माहिती संकलित करून त्या विभागाच्या ॲप / संकेतस्थळावर नोंद करणे. जी माहिती संगणकीय प्रणालीमध्ये उपलब्ध आहे , ती माहिती ऑफलाइन पद्धतीने दुबारा मागवणे अनावश्यक प्रशिक्षणे कार्यशाळा उपक्रम अभियान मिळावे इत्यादी शासनाच्या मान्यते शिवाय राबवली जाणे शासन मान्यता नसलेल्या अन्य प्रकारच्या कार्यक्रमात शिक्षकांना कर्तव्य कालावधीत ऑन ड्युटी सहभाग घेणे,  शिक्षण विभागाकडे कामाव्यतिरिक्त अन्य विभागाकडे देण्यात येणारी कामे अशा प्रकारची अशैक्षणिक कामे सदर निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेली आहे.

तर शैक्षणिक कामामध्ये शिक्षकांना दिली जाणारी नियमित कामे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष नमूद करण्यात आलेली आहे या संदर्भातील सविस्तर शैक्षणिक व अशैक्षणिक कामे पाहण्याकरिता पुढील सविस्तर शासन निर्णय पहावा ..

Leave a Comment