शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत बैठकीचे इतिवृत्त ..

Spread the love

E-marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Teacher & Non Teaching Staff old pension scheme meeting ] : राज्य शासनांच्या शिक्षण विभागाच्या दिनांक 13 ऑगस्ट 2024 राोजीच्या निर्णयानुसार दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पुर्वी टप्पा अनुदानावर असणाऱ्या व दिनांक 01 नोव्हेंबर 2005 नंतर 100 टक्के अनुदानावर असणाऱ्या शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागु करणे संदर्भात गठित समितीचे व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

सम्यक विचार समितीने सादर करण्यात आल्यानुसार आर्थिक भराबाबत पुन : तपासणी करण्यासाी समितीचे गठण करण्यात आल्याचे निर्देश देण्यात आले होते , त्याप्रमाणे आयुक्त ( शिक्षण ) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनांच्या दिनांक 13.08.2024 शासन निर्णयानुसार दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पुर्वी टप्पा अनुदानावर असणाऱ्या व दिनांक 01 नोव्हेंबर 2005 नंतर 100 टक्के अनुदानावर असणाऱ्या शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनी पेन्शन ( Old Pension ) लागु करणे संदर्भात दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस अध्यक्ष तथा आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत ..

श्री.किशोर दराडे , श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे , जगन्नाथ अभ्यंकर ( विधान परिषद सदस्य ) तसेच इतर 06 सदस्य उपस्थित होते . सदर समितीने काही बाबींची तपासणी करुन आपला अहवाल सादर करण्यासाठी सुचित करण्यात आलेले आहेत . यांमध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीच्या प्रत्यक्ष दिनांक अशा शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी यांची संख्या तसेच त्यानुसार सेवानिवृत्ती विषयक लाभ अदा करावयाचा असल्यास प्रत्यक्षात येणारा खर्च , तसेच संपुर्ण खर्चाचा वर्षनिहाय तपशिल ,तसेच सेवानिवृत्ती विषयक प्रत्येक लाभ निहाय खर्चाचा वर्षनिहाय तपशिल या बाबी नमुद करण्यात आलेल्या आहेत .

हे पण वाचा : भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांच्या तब्बल 3115 जागेसाठी आत्ताची मोठी महाभरती , Apply Now .

शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु न केल्यास , त्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये समाविष्ठ केल्याच्या नंतर त्याकरीता शासन हिस्स्यासाठी आवश्यक असणारी तरतुद सम्यक विचार समितीने गणना करुन शासनास सादर केली आहे , व सदर रकमेचाही विचार या शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लाु करण्याच्या भारामधून कमी करावा लागेल .

शासनांने राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागु असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी शेवटच्या मुळ वेतनाच्या 50 टक्के निवृत्ती वेतन देण्याचे शासनाने तत्वत : मान्य केले आहेत , तसेच मा. मुख्यमंत्री यांनी घोषित केले आहे असे श्री. शिवाजी खांडेकर सदस्य यांनी सुचित केले आहे तसेच सदर बाबीचा समितीने विचार करावा असेही यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment