पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार बातमीबाबत , राज्य शासनांकडून खुलासा !

Spread the love

E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Teacher Exme clarification ] : पवित्र पोर्टलच्या माध्यमातुन शिक्षकांना आणखीन एक परीक्षा द्यावी , लागणार या बातमीबाबत , राज्य शासनांच्या शालेय शिक्षण विभागांकडून खुलासा देण्याच्या अनुषंगाने प्रेस नोट जाहीर करण्यात आलेले आहेत .

राज्यातील खाजगी तसेच स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातुन 21,678 रिक्त जागेवर एकुण 19,986 पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे .तर राज्य शासनांच्या दि.19.06.2013 रोजीच्या निर्णयातील धोरणांनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी ( जिल्हा परिषदा ) यांच्या मागणीप्रमाणे सेमी इंग्रजी माध्यमांकरीता शिक्षक उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली आहे .

तसेच सदर शिक्षकांची शिक्षण सेवक कालावधीमध्ये कौशल्य चाचणी त्याचबरोबर प्रशिक्षण परिषद अंतर्गत इंग्रजी भाषेशी संबंधित तज्ञ संस्थाकडून ज्ञान अवगत करण्याचे निर्देश आहेत . कारण सध्यस्थितीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमातुन उत्तम दर्जाचे शिक्षण दिले जाते , तसेच त्यांच्या पालकांना परवडत नसल्याने इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांवर अवलंबून रहावे लागु नयेत याकरीता इंग्रजी विषयाशी अधिक प्रकारे ज्ञान असणाऱ्यां शिक्षकांना सदर परीक्षा पद्धतीतुन जाण्याची तरतुद करण्यात आलेली आहे .

सदर पवित्र पोर्टलच्या माध्यमातुन एकुण 1288 उमेदवारांची सेमी इंग्रजी माध्यमांकरीता शिफारस करण्यात आलेली आहे .म्हणजेच सदर 1288 उमेदवारांनाच सदर परीक्षा द्यावी लागणार असल्याचे नमुद करण्यात आहेत .

हे पण वाचा : भारतीय स्टेट बँकेत विविध जागांच्या तब्बल 1511 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..

यामुळे सदरची परीक्षा पवित्र पोर्टलच्या माध्यमातुन शिफारस करण्यात आलेल्या सर्वच शिक्षकांना द्यावी लागणार नसाल्याचे स्पष्टीकरण सदर प्रेस नोट मध्ये शालेय शिक्षण विभागांकडून नमुद करण्यात आले आहेत .

Leave a Comment