E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ State employee Retirement age & Old Pension demand news ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे व जुनी पेन्शन योजना बाबत राज्य शासनांचा नेमका काय विचार आहे , याबाबत सविस्तर माहिती या लेखांमध्ये घेवूयात ..
जुनी पेन्शन बाबत काय विचार ? : राज्य शासनांकडून जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , राज्य शासनांकडून सकारात्मक भुमिका घेण्यात येत आहेत , परंतु केंद्र सरकारकडून याबाबत , निर्देश आल्यानंतरच याबाबत निर्णय होवू शकतो , कारण केंद्र सरकारकडून जुनी पेन्शनला विरोध होत आहे .
सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना ही जुनी पेन्शन प्रमाणे लागु करण्याची घोषणा राज्य शासनांने नुकतेच केली होती , परंतु सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना बाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला गेला नाही , विधानसभेच्या निवडणुका तोंडावर येवून पोहोचल्या आहेत . तरी देखिल याबाबत निर्णय होत नाही . यामुळे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनाबाबत निर्णय कधी होईल याबाबत राज्य शासनांकडून स्पष्ट भुमिका मांडण्यात येत नसल्याने , कर्मचाऱ्यांना संभ्रम निर्माण होत आहेत .
सेवानिवृत्तीच्या वय 60 वर्षे करणेबाबत राज्य शासनांचा कोणता विचार ? राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत ,राज्य शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री यांनी जाहीर केले होते , परंतु सदर निर्णयास विद्यार्थी संघटनेकडून विरोध होत असल्याचे कारण देत सदर मागणीबाबत निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे .
यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष या मागणीकरिता आणखीन वाट पहावी लागणार आहे , हे मात्र नक्की आहे .