E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ state employee planning department imp shasan nirnay ] : शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनांच्या नियोजन विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , अर्थ व सांख्यिकी संचालनालय , मुंबई या कार्यालयाकडुन महाराष्ट्र शासनांच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष दरवर्षी अद्ययावत करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे . या माहितीकोषांमध्ये नियमित आस्थापनेवरील कर्मचारी व नियमिततर आस्थापनेवरील कर्मचारी ( कार्यव्ययी आस्थापनेवरील यांमध्ये रोजंदारी , अंशकालीन , मानसेवी ) तसेच तदर्थ तत्वावर नेमणुका करण्यात आलेले कर्मचारी अशा सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करण्यात येणार आहे .
त्या आधारे शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्व भरलेल्या व रिक्त पदांच्या माहितीचा समावेश असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वंकष माहितीकोष अद्ययावत करण्यात येत आहे . त्या अनुषंगाने दिनांक 01 जुलै 2024 या संदर्भ दिनांकास कर्मचाऱ्यांचा सेवार्थ आयडी , भविष्य निर्वाह निधी / डीसीपीएस खाते क्रमांक , पॅन क्रमांक , आधार क्रमांक , कर्मचाऱ्यांचे संपुर्ण नाव , जन्म दिनांक , लिंग सेवेत रुजु झाल्याचा दिनांक ..
तसेच निवृत्तीचा दिनांक , ईमेल आयडी , मोबाईल नंबर , पदनाम , सेवेत रुजु झाल्यानंतरचे पदनाम , धर्म , जात , स्वग्राम , दिव्यांग व्यक्ती इ. स्थायी स्वरुपाची माहिती सतेच ( लागु असल्यास ) सध्याचे पदनाम , सध्याच्या पदावरील पदोन्नतीचा दिनांक , आश्वासित प्रगती योजना इ. माहिती गोळा करण्यात येणार आहे .
त्याचबरोबर माहे जुलै 2024 या संपुर्ण महिन्यांच्या वित्तलब्धीची तपशिलवार माहितीही गोळा करण्यात येणार आहे , माहिती नोंदणीकरीता अर्थ व सांख्यिकी संचालनाकडुन संगणकीय ऑनलाईन आज्ञावली तसेच लॉग – इन आयडी व पासवर्ड व माहिती भरण्याचे व आज्ञावली वापरण्या संबंधीचे सुचना संच संबंधित कार्यालयांना उपलब्ध करुन देण्यात येईल , असे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष – 2024 विहीत वेळेत करण्यासाठी व त्याची कार्यवाही योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी राज्य शासनाचे आहरण व संवितरण अधिकारी यांनी पुढील वेळापत्रक व सुचना विचारात घेवून त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भातील नियोजन विभागांकडून दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.