E-marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ state employee old pension scheme shasan nirnay ] : राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनांच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागु करणेबाबत , राज्य शासनांच्या जलसंपदा विभागांकडून दिनांक 04 सप्टेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
केंद्र सरकारच्या अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्ती ही ज्या पदांवर अथा रिक्त जागेवर करण्यात आलेली आहे व ज्याची जाहीरात / नियुक्तीची अधिसुचना / भरतीची नविन निवृत्तीवेतन योजना लागु करण्याच्या अधिसुचनेच्या दिनांकापुर्वी म्हणजेच दिनांक 22 डिसेंबर 2003 पुर्वी निर्गमित करण्यात आलेली आहे . व जे दिनांक 01 जानेवारी 2004 रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झाले आहेत , व ज्यांना नविन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागु झाली आहे .
त्या केंद्र शासनांच्या अधिकारी / कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा ( निवृत्ती ) नियम 1972 / 2021 लागु करण्याचा एक वेळ पर्याय देणेबाबतचा निर्णय केंद्र शासनांच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारकांचे कल्याण विभागाच्या दिनांक 03 मार्च 2023 रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार घेण्यात आला आहे .
हे पण वाचा : नोकरी करणाऱ्या महिलांचे लैंगिक शोषण तसेच अत्याचार रोखणेबाबत , सरकारकडून नविन कायदा .
सदर शासन निर्णयानुसार जलसंपदा विभाग अंतर्गत कार्यरत अभियंता ( स्थापत्य ) या पदावर सध्यस्थितीमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना केंद्र शासनांच्या धर्तीवर वित्त विभागाच्या दिनांक 02 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार , महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम 1982 , महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण ) नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 व अनुषंगिक तरतुदी लागु करण्यास मान्यता देण्यात येत आहेत .
या संदर्भातील निर्गमित सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.16.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !
- राज्यात या 11 दिवशी पडणार मुसळधार पाऊस ; ” या” जिल्ह्यांना अलर्ट जारी – पंजाबराव यांचा नवा हवामान अंदाज ..
- दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असताना निधन झालेल्या / होणाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सुधारित करणेबाबत महत्वपुर्ण GR .
- पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार बातमीबाबत , राज्य शासनांकडून खुलासा !
- राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ; सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ..