शासकीय / निमशासकीय तसेच शासनांकडून निधी प्राप्त संस्थामधील नियुक्त कर्मचाऱ्यांची तपासणी करणेबाबत GR निर्गमित दि.16.08.2024

Spread the love

E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ state employee checking shasan nirnay gr ] : राज्यातील शासकीय / निमशासकीय तसेच शासनांकडून निधी प्राप्त होणाऱ्या संस्थांमध्ये नियुक्त होणाऱ्या उमेदवारांच्या दिव्यांगत्वाची तपासणी करणेबाबत राज्य शासनांच्या दिव्यांग कल्याण विभागांकडून दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

दिव्यांगत्व तपासणी , मुल्यमापन व प्रमाणपत्र वितरण करीता मार्गदर्शक सुचना देण्यात आलेल्या आहेत , तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 29 मे 2019 रोजीच्या निर्णयानुसार दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या अनुच्छेद 34 नुसार शासन सेवेतील पदांवर शारीरिक दृष्ट्या दिव्यांगासाठी सरळसेवेत 4 टक्के आरक्षण विहीत करुन त्यांच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती विहीत करण्यात आलेली आहे .

तसेच सामान्य प्रशासन विभागाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगांकडून घेण्यात येणाऱ्या परिक्षेमधून शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या दिव्यांगांना शासन सेवेत नियुक्त करण्यापुर्वी दिव्यांगत्वाची तपासणी करण्याबाबत सुचना देण्यात आलेले आहेत , यांमध्ये दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत सदर उमेदवार संबंधित पदांवर नियुक्तीसाठी सक्षम आहे अथवा नाही याची वैद्यकीय मंडळाकडून तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

तसेच या उमेदवारांच्या दिव्यांगत्वाची वैद्यकीय तपासणी करण्याबाबत व सदर वैद्यकीय पडताळणी अंती निदर्शनास आलेले त्यांच्या दिव्यांगत्वाचे प्रमाण त्यांच्या वैद्यकीय अहवालांमध्ये नमुद करण्याबाबत देखिल संबंधित वैद्यकीय मंडळास सुचना देण्यात आल्या आहेत .

तसेच याबाबत सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना सुचित करण्यात येत आहेत कि , याबाबत संदर्भ नुसार विभागाच्या शासन परिपत्रकानुसार केंद्र शासनांच्या धर्तीवर दिव्यांगत्व संदर्भातील सर्व प्रकारचे लाभ मिळण्यासाठी वैश्विक ओळखपत्र बंधनकारक करणेबाबत सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment