सोयाबीनच्या भावामध्ये सुधारणा तर कापसाचे भाव स्थिर ; शेतकऱ्यांना दिलासा !

Spread the love

E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ soyabean rate increase & cotton rate stable news ] : सोयाबीनच्या भावामध्ये सुधारणा दिसून येत आहे , मागील आठवड्यामध्ये सोयाबीनचे भाव चार हजार पेक्षा कमी झाली होते , यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावा लागत होता . परंतु सध्या सोयाबीनच्या भावामध्ये हळूहळू सुधारणा येत असल्याचे दिसून येत आहे , तर कापसाचे भाव अद्याप स्थिर आहेत .

शुक्रवारच्या दिवशी सोयाबीन , सोयापेंड तसेच सोयातेल भावामध्ये वायदे बाजारात सुधारणा झाली , यामुळे देशात शुक्रवारच्या दिवशी सोयाबीन , सोयापेंड व सोयातेलस चांगला भाव मिळत  आहे . त्यादिवशी सोयाबीनला बाजारामध्ये 4,400/- रूपये इतका भाव मिळाला आहे . तर शनिवारच्या दिवशी सोयाबीन 4550/-  ते 4700 /- रुपयांनी सोयाबीनची खरेदी करण्यात आली .

सोयाबीनच्या भावामध्ये आणखीन चढउतार दिसण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.  सोयाबीनला प्रति क्विंटल पाच हजार रुपये इतका कमाल भाव मिळण्याची शक्यता आहे . सद्यस्थितीमध्ये सोयाबीनच्या भावात प्रतिक्विंटल पाचशे ते सातशे रुपये वाढ झाल्याने , शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे .

कापसाचे भाव स्थिर : आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाला शुक्रवारच्या दिवशी प्रतिक्विंटल 6900/-  ते 7500/- रुपये इतका भाव मिळाला , ही स्थिती आणखीन काही दिवस राहण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.  जे की शेतकऱ्यांना आठ ते नऊ हजार प्रति क्विंटल भाव अपेक्षित आहे .

शेतकऱ्यांनो नियमित हवामान अंदाज कृषी विषयक माहिती योजना यांची रेग्युलर  अपडेट साठी खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !.

Leave a Comment