E-marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Soyabean Producer farmer good news , hamibhav increase ] : मागील आठवड्यापासुन सोयाबीनच्या बाजारभावामामध्ये वाढ होताना दिसून येत आहेत , ही वाढ अचानक झाली असल्याने , शेतकऱ्यांना मोठा फायदा होताना दिसून येत आहेत . केंद्र सरकारकडून सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे .
केंद्र सरकारने सोयाबीनची किमान आधारभुत किंमत 4,892/- रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित करण्यात आली असून, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत केंद्र सरकारला वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता . सदर हमीभावामध्ये वाढ झाल्याने आता राज्यात सर्व बाजार समितीमध्ये किमान आधारभुत किंमत मध्ये वाढ होवून सोयाबीनची 4892/- रुपये प्रति क्विंटलप्रमाणे खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे .
सरकारने हमीभावात केलेली वाढ ही राज्यात पुढील 90 दिवसांसाठी असणार आहे , त्यानंतर हमीभावाचे दर बदलु शकतील . सदर हमीभाव हे देशात महाराष्ट्र , कर्नाटक या दोन राज्याकरीता लागु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .
याशिवाय सोया मिल्क तसेच खाद्यतेल , सोया केक या आयातीवर शुल्क लावावेत , तसेच सोयाबीन निर्यातीवर अनुदान देण्यात यावेत , अशी मागणी राज्य शासनांकडून केंद्र सरकारकडे करण्यात येत आहे . ज्यामुळे शेतकऱ्यांना आणखीन चांगला आर्थिक फायदा होईल .
💁💁हे पण वाचा : राज्यातील शेतकऱ्यांसाठी निर्गमित अत्यंत महत्त्वपूर्ण मोठी अपडेट !
सोयाबीन / कापुस उत्पादकांना मदत निधी लवकरच : त्याचबरोबर राज्यातील सोयाबीन व कापुस उत्पादक शेतकऱ्यांना मदत निधी म्हणून प्रति हेक्टरी 5,000/- ( कमाल 2 हेक्टर करीता 10,000/- ) देण्यासाठी राज्य सरकारकडून 4200/- कोटी रुपये अनुदान उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत . यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच सदर मदत निधी वर्ग केली जाणार आहे .
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.16.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !
- राज्यात या 11 दिवशी पडणार मुसळधार पाऊस ; ” या” जिल्ह्यांना अलर्ट जारी – पंजाबराव यांचा नवा हवामान अंदाज ..
- दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असताना निधन झालेल्या / होणाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सुधारित करणेबाबत महत्वपुर्ण GR .
- पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार बातमीबाबत , राज्य शासनांकडून खुलासा !
- राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ; सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ..