E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [Soyabean hamibhav increase news from krushi ministry ] : सध्या सोयाबीनला 4 हजार रुपये पेक्षाही कमी भाव मिळत आहे , यामुळे आता केंद्र शासनांकडून सोयाबीनला हमी भाव देण्याची तरतुद करण्यात आली आहे . सोयाबीनचा भाव 4 हजार पेक्षाही कमी झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च देखिल निघत नाहीत .
परळी येथे दिनांक 21 ऑगस्ट पासुन सुरु झालेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान सांगितले कि , सध्या सोयाबिनचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारभावामुळे बरेच खाली आले आहेत . यावेळी केंद्रीय कृषीमंत्र्यांनी सोयाबीनला हमीभाव देण्याची माहिती दिली .
4892/- रुपये हमीभाव : सोयाबीनच्या उतारत्या भावामुळे सोयाबीनला रुपये 4892/- रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव केंद्र शासनांकडून जाहीर करण्यात आला आहे . या हमीभावानुसार लवकरच शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येईल , यामंमध्ये खाजगी खरेदारांना देखिल 15 टक्के निधी देण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या कडून देण्यात आली आहे .
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने , सोयाबीनच्या भावामध्ये दबाव आले आहेत , यामुळे सोयाबीनला किमान हमीभाव मिळावा यासाठी सरकारकडून तीन पर्यांवर विचार केला जात असल्याचे सांगण्यात आले .
हे पण वाचा : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलांमध्ये तब्बल 1130 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
भावांतर योजना : कृषीमंत्र्यांनी भाषण दरम्यान सांगितले कि , बाजारात मिळणारे भाव व हमीभाव यातील फरकाची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येईल , असा एक पर्याय नमुद करण्यात आला .
खासगी क्षेत्रातील खरेदीदारांना सहाय्य : बाजारातील खासगी क्षेत्रातील व्यापारी वर्गांना सोयाबीन खरेदीसाठी 15 टक्के मदत देण्याचा पर्यायही कृषीमंत्र्यांनी सुचविले आहे .
हमीभावाने सोयाबीनची खरेदी : सोयाबीनची 4892/- प्रति क्विंटल हमीभावाने खरेदी करण्याचा पर्याय सुचविण्यात आला , ज्यामुळे खुल्या बाजारांमध्ये देखिल सोयाबीनला भाव मिळण्यास मदत होईल असे नमुद करण्यात आले आहेत .
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.16.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !
- राज्यात या 11 दिवशी पडणार मुसळधार पाऊस ; ” या” जिल्ह्यांना अलर्ट जारी – पंजाबराव यांचा नवा हवामान अंदाज ..
- दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असताना निधन झालेल्या / होणाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सुधारित करणेबाबत महत्वपुर्ण GR .
- पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार बातमीबाबत , राज्य शासनांकडून खुलासा !
- राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ; सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ..