सोयाबीन , कापुस अनुदान यादीमध्ये नाव नसल्यास , काय करावेत ? जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Soyabean & Cotton anudan news ] : सोयाबीन व कापुस अनुदान यादी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत प्रसिद्ध करण्यात येत आहेत . सदरच्या यादीमध्ये केवळ ज्यांनी ई- पीक पाहणी ॲप्सवर नोंदणी केली आहे , अशा शेतकऱ्यांचेच नाव समाविष्ठ आहेत , तर ज्यांनी सदर ॲप्सवर नोंदणी केली नाही , अशा शेतकऱ्यांना अनुदान मिळणार कि , नाही याबाबत अनेक शेतकऱ्यांना शंका आहे , अशा शेतकऱ्यांनी अनुदान मिळविण्यासाठी काय करावेत , याबाबत सविस्तर माहिती घेवूयात ..

कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000/- ( कमाल 10,000/- रुपये ) मर्यादेत अनुदान देण्यास राज्य शासनांने मान्यता दिली आहे . सदर अनुदान हे ज्यांनी ई -पीक पाहणी च्या माध्यमातुन केली आहे , अशा शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात अनुदानाचे पैसे हस्तांतरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .

यासाठी शेतकऱ्यांकडून संमीपत्र घेण्यात येत आहेत , कृषी आयुक्तालयांकडुन मिळालेल्या माहितीनुसार , ज्यांनी मागील वर्षी ई – पीक पाहणी वर ज्यांनी नोंद केली आहे , असेच शेतकरी हे सदर अुनदानास पात्र ठरणार आहेत , असे नमुद केले आहेत . परंतु मागील वर्षी ई – पीक पाहणी करुन देखिल यादींमध्ये नाव नसेल तर अशांना केवळ एकाच पिकांसाठी पात्र ठरविण्यात आले आहेत .

म्हणजेच कापुस अथवा सोयाबीन यापैकी एका पिकांसाठी अनुदास पात्र ठरविण्यात आले आहेत . अशांनी आपल्या तलाठ्यांशी संपर्क साधण्याचे सुचना कृषी आयुक्तालयांनी दिले आहेत .

ई – पिक पाहणी करुनही अनुदान पात्र यादींमध्ये नाव नसेल , तसेच केवळ एकाच पिकास पात्र ठरविण्यात आले आहेत , अशा प्रकरणी तलाठ्यांकडे तक्रार नोंद करावी , तपासणी करुन सुधारीत यादी तयार करण्यात येईल , असे नमुद करण्यात आले आहेत .

Leave a Comment