दिनांक 16 व 17 सप्टेंबर रोजीच्या शासकीय सुट्टीबाबत राज्य शासनाकडून निर्गमित ;  सविस्तर अधिसूचना जाणून घ्या !

Spread the love

E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ public holiday Shasan adhisuchana ] : दिनांक 16 व 17 सप्टेंबर रोजीच्या शासकीय सुट्टी संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे .

राज्य शासनाने सन 2024 वर्षाकरिता राज्य शासकीय कार्यालयांना तसेच इतर अधिनस्त कार्यालयांना एकूण 24 सार्वजनिक सुट्ट्या परक्राम्य सल्लेख अधिनियम 1981 च्या कलम 25 अंतर्गत अधिसूचना दिनांक 9 नोव्हेंबर 2023 नुसार अधिसूचित केले आहेत . या संदर्भात  दिनांक 13 सप्टेंबर 2024 सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेनुसार सुट्टी बाबत सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आले आहेत .

एकूण 24 सार्वजनिक सुट्ट्यामध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी दर्शविण्यात आलेली आहे . ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात सादर करीत असतात , यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते . त्याचबरोबर मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी अनंत चतुर्थी हा हिंदू धर्मीयांचा महत्त्वपूर्ण सण असल्याने,  सदर दोन्हीही हिंदू-मुस्लिम धर्मामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

सदरची बाब लक्षात घेता मुंबई शहर व मुंबई उपनगर या क्षेत्रामध्ये वार सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी घोषित करण्यात आलेली ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती आता वार बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 या दिवशी जाहीर करण्यात येणार असल्याचे , सदर अधिसूचनानुसार नमूद करण्यात आली आहे .

तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा व्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियांकडून करण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांक विचारात घेऊन सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून दिनांक बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी या संदर्भात सदर जिल्ह्याची संबंधित जिल्हाधिकारी यांनी निर्णय घेण्याचे निर्देश सदर शासन अधिसूचनेनुसार सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आलेले आहेत .

Leave a Comment