यंदा सप्टेंबर , ऑक्टोबर महिन्यात जोरदार पावसाची शक्यता ; हवामान खात्याने वर्तवला आत्ताचा नवीन अंदाज !

Spread the love

E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ September October havamana andaj ] : यंदाच्या वर्षी ला नीनाच्या प्रभावामुळे , यंदाच्या वर्षी पावसाचा मुक्काम अधिकच वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे . माहे सप्टेंबर , ऑक्टोबर महिन्यात देशात जोरदार पाऊस असणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे .

सद्यस्थितीचा विचार केला असता , देशामध्ये बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे . तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळित झाली आहेत , तर यंदाच्या वर्षी चांगल्या पावसामुळे शेती पिकांना चांगला दिलासा मिळाला आहे . परिणामी कृषी उत्पन्न वाढण्यास मदत होईल . तर सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यामध्ये आणखीन जोरदार पाऊस असणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेल्या आहे .

पावसामुळे पिकावर होणार परिणाम : ऑक्टोबर महिन्यामध्ये बहुतेक खरीप पिकांची काढणी केली जाते , या कालावधीमध्ये पावसाचे प्रमाण अधिक असल्यास काढणीवर विपरीत परिणाम होऊ शकतो . परिणामी उत्पादन कमी होईल , म्हणजेच जवळपास दहा टक्के उत्पन्न घटनेची शक्यता आहे .

ला निना मुळे जोरदार पाऊस : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार ला निना मुळे कमी दाबाचा पट्टा तयार होणार असल्याने ,  पुढील महिन्यात ( सप्टेंबर ) जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .  सदर पाऊस ऑक्टोबर महिन्यानंतर परतीचा प्रवास करणार आहे .

हे पण वाचा : दहावी व बारावी मध्ये 60% पेक्षा अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांना 51 हजार रुपयांची आर्थिक मदत !

ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांना रब्बी पिकाकरिता फायदा होणार आहे , कारण जमिनीमध्ये ओल टिकून राहणार असल्याने , रब्बी पिकासाठी पेरणी करिता जमिनीमध्ये आवश्यक ओलावा टिकून राहील व पिकांची वाढ होण्यास मदत होईल .

शेतकऱ्यांनो नियमित हवामान अंदाज कृषी विषयक माहिती योजना यांची रेग्युलर  अपडेट साठी खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !.

Leave a Comment