माहे सप्टेंबर 2024 वेतन देयक संदर्भात आत्ताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट ; जाणून घ्या सविस्तर परिपत्रक !

Spread the love

E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ September month payment update paripatrak ] : राज्यातील शाळा , महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण तयार करण्याकरिता राज्य शासनाकडून विविध उपाय योजना राबवले जात आहेत . जेणेकरून मुलींना शालेय  आवारामध्ये सुरक्षितेच्या दृष्टीने आनंददायी वातावरण तयार होईल, या अनुषंगाने जिल्हा परिषद कार्यालय बुलढाणा यांच्यामार्फत अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांच्यामार्फत एक महत्त्वपूर्ण परिपत्रक सादर करण्यात आलेला आहे. 

सदर परिपत्रकानुसार सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे , तक्रार पेटी बसवणे , सखी सावित्री समिती गठीत करणे व विद्यार्थी सुरक्षा समिती गठीत करणे बाबत प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय वेतन देयक न स्वीकारण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे . सदर परिपत्रकानुसार राज्य शासनाच्या दिनांक 05 मे 2017 रोजी च्या शासन निर्णयानुसार तक्रारपेटी बसवून पुढील  कार्यवाही शाळा स्तरावर करण्याबाबत नमूद करण्यात आलेली आहेत .

त्याचबरोबर राज्य शासनाच्या दिनांक 10 मार्च 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार शाळास्तरावर सखी सावित्री समिती गठन करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे . त्याचबरोबर राज्य शासनाच्या दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षाविषयक उपाय योजनांची काटेकोर अंमलबजावणीसाठी प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थी सुरक्षा समिती गठित करणे बाबत , तथा शासन निर्णयाच्या दिनांकापासून 01 महिन्यांच्या आत सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक करण्यात आले आहेत .

हे पण वाचा : जिल्हा परिषद अंतर्गत मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

याबाबत सदर शासन निर्णयात नमूद केल्यानुसार तात्काळ कार्यवाही करण्याबाबत मुख्याध्यापक यांना सूचित करण्यात आलेली आहेत . परंतु अद्याप बऱ्याच शाळांनी सदर कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली नाही , वरील नमूद सर्व कार्यवाही केल्याबाबत प्रमाणपत्र माहे सप्टेंबर 2024 चे वेतन देयक सोबत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे . सदस्य प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या शाळांची माहे सप्टेंबर 2024 चे वेतन देयके स्वीकारू नयेत , असे नमूद करण्यात आले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment