आता रेशनकार्ड धारकांना तांदुळ ऐवजी मिळणार हे 9 जिवनावश्यक वस्तु ; जाणुन घ्या सविस्तर ..

Spread the love

E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Reshan Card holder gets new 09 essential product ] : राज्यातील रेशनकार्ड धारकांना आता तांदुळ ऐवजी जिवनावश्यक वस्तु मिळणार असल्याची माहिती समोर येत आहेत . सध्य स्थितीमध्ये देशातील 90 कोटी नागरिकांना राशन योजना अंतर्गत केवळ गहु व तांदुळच दिले जाते .

देशांमध्ये गरीब जनतेला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे तांदुळ व गहु स्वस्त दरांमध्ये दिले जाते , परंतु आजची स्थिती बदलली असून , जनतेला जीवन जगण्यासोबत आरोग्यमयी जीवन जगता यावेत , याकरीता शरीराला आवश्यक असणाऱ्या 09 पदार्थांचा समावेश सदर राशन योजना अंतर्गत करण्यात येणार आहेत .

यांमध्ये डाळी , हरभरा , गहु , मीठ , तेल , मैदा , मसाले , सोयाबीन , साखर अशा महत्वपुर्ण धान्य / खाद्यपदार्थांचा समावेश असणार आहे . यामुळे देशातील रास्त भावातुन खरेदी करणाऱ्या नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे . ज्यामुळे गरीब व सर्वसामान्यांचे जीवनमान सुधारण्यास देखिल मदत होईल अशी सरकारची धारण आहे .

हे पण वाचा : लाडकी बहीण योजने अंतर्गत सप्टेंबर महिन्यामध्ये पात्र महिलांना मिळणार 4,500/- ; आधार लिंक खात्यामध्येच येणार पैसे .

महसुल विभागांकडून नोकरीला असणाऱ्यांचे नावे पिवळे / केशरी रेशनकार्ड वरुन कमी करण्याचे काम सुरु आहेत . यासाठी महसुल विभागांकडून कर्मचाऱ्यांच्या सेवार्थ / शालार्थ अशा सरकारी प्रणालीवरुन सरकारी सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचे आधारकार्ड घेवून ते नावे ज्या रेशनकार्डवर आहेत ते , रेशनकार्ड स्वस्त रेशन घेण्यासाठी रद्द करण्यात येत आहेत .

जर आपणांकडे अद्याप रेशनकार्ड नसेल तर तहसिल कार्यालयांकडे सविस्तर अर्ज सादर करुन नविन रेशनकार्ड काढून घ्यावेत . जेणेकरुन सरकारच्या या नविन 09 अन्नधान्य व खाद्य पदार्थांचा लाभ मिळू शकेल .

Leave a Comment