E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ phone pay instant loan upto 5 lakh rs. ] : फोन पे ॲप्सच्या माध्यमातुन 5 लाख रुपये पर्यंतचे कर्ज तात्काळ मिळवू शकता तेही कोणत्याही कागदपत्रांशिवाय , चला तर मग जाणून घेवूयात व्याजदर , मुदत , EMI ..
फोन पे ॲप्सने ग्राहकांची गरज लक्षात घेता कर्ज सुविधा सुरुवात केली आहे , यांमध्ये आपणांस Personal Loan , Home Loan , Bike Loan , Gold Loan , Car loan , Loan On property , Education Loan , Mutual Fund Loan इत्यादी प्रकारचे कर्ज सुविधा देण्यात आलेली आहे , यापैकी पर्सनल लोन सुविधा फोन पे मार्फत देण्यात येते , तर बाकी लोन हे पार्टनर्स लोन सुविधा देण्यात आलेली आहे .
यांमध्ये आपणांस पर्सनल लोन घ्यायचे असेल तर पुर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीचे आहे , यांमध्ये प्रथम आपली वैयक्तिक माहिती , KYC Varification , Autopay Setup , Loan Agreement इतकी माहिती भरल्या नंतर तात्काळ कर्जाची रक्कम आपल्या खात्यावर वर्ग केली जाते .
यांमध्ये आपणांस आपल्या सीबील प्रमाणे कर्जाची रक्कम फोन पे मध्ये दर्शविली जाते , जर आपणांस यांमध्ये कमाल 30 महिने तर किमान 18 महिने करीता कर्ज घेता येते , तसेच 24 महिने मुदतीची कर्ज सुविधा उपलब्ध आहे . सदर कर्जावर प्रति महा 1.75 टक्के इतका व्याजदर आकारला जातो .
जर आपण 4 लाख रुपयांचे कर्ज घेतल्यास आपणांस 1.75 टक्के प्रतिमहा व्याजदर प्रमाणे 30 महिन्यांसाठी प्रतिमहा 17,252/- रुपये इतका EMI पडेल , तर 24 महिन्यांसाठी 20,255 रुपये तर 18 महिन्यांसाठी 26,098/- रुपये इतका EMI पडेल .
सदरची प्रक्रिया ही पुर्णपणे पेपरलेस प्रक्रिया आहे , यांमध्ये कोणतेही इनकम प्रुफ मागितले जात नाहीत . तात्काळ कर्ज दिले जाते . यामुळे ही एक प्रकारची ग्राहकांसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .
कर्ज घेण्याची पात्रता : कर्ज घेणाऱ्याचे किमान वय हे 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक असेल तसेच तो भारतीय नागरिक असणे आवश्यक असेल . तसेच कर्जदाराचे वार्षिक घरगुती उत्पन्न हे 3,00,000/- रुपये असणे आवश्यक असेल . कर्ज घेण्यासाठी फोन पे सोबत करार करणे बंधनकारक असणार आहे .