पेन्शनधारकांना दि.01.01.2025 पासुन अत्यंत महत्वपुर्ण नविन सुविधा लागु होणार !

Spread the love

E-marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ pensioners important facility start from 01 January 2025 ] :  पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी अपडेट समोर येत आहेत , ती म्हणजे पेन्शनधारकांना दिनांक 01 जानेवारी 2025 पासुन नविन सुधारित सविधा लागु करण्यात येणार आहेत .

सध्य स्थितीमध्ये पेन्शन धारकांना आपली हक्काची पेन्शन घेण्यासाठी आपल्या मुळे बँक शाखेमध्येच जावे लागते , अन्यथा पेन्शन मिळत नाही , शिवाय पेन्शन खात्याला अटीएम , तसेच अन्य ऑनलाईन सुविधा उपलब्ध नसतात . यामुळे सध्या पेन्शन धारक अन्य ठिकाणी स्थानांतरीत / प्रवास करीत असल्यास , पेन्शनचा लाभ घेवू शकत नाहीत , त्यांना आपल्या मुळ खाते असणाऱ्या शाखेतच जावू लागते . आता यांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत .

ईपीएफओच्या केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री यांच्यासोबत झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये पेन्शन धारकांना अन्य बँक शाखेमध्ये पेन्शन काढण्याच्या सुविधा देणाऱ्या प्रस्तावास मंजूरी दिली आहे . यामुळे आता पेन्शनधारक देशातील अन्य कोणत्याही बँकेतुन / अन्य कोणत्याही बँक शाखेतुन पेन्शन काढू शकणार आहेत , ही सुविधा त्यांना दिनांक 01.01.2025 पासुन सुरु केली जाणार आहे .

केंद्रीकृत पेन्शन प्रणालीची मंजूरी हा एक प्रकारचा ईपीएफओच्या आधुनिकीकरणांमधील एक महत्वपुर्ण टप्पा असल्याचे केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी सांगितले .सदर सविधाचा वापर करुन पेन्शन धारक कोणत्याही बँक मधून तसेच देशातील कोणत्याही बँक शाखेतुन पेन्शनची रक्कम काढू शकणार आहेत .

हे पण वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव डी.ए , सुधारित पेन्शन , वाढीव HRA बाबत आत्ताची मोठी अपडेट ..

अशा प्रकारची सुविधा प्रगत आयटी व बँकींग तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार केली जाणार आहे . तर पेन्शन पेमेंट ऑर्डर ही आता यापुढे एका कार्यालयातुन दुसऱ्या कार्यालयांमध्ये हस्तांरित न करताच CPPF संपुर्ण देशात पेन्शन वितरण केले जाईल , असे नमुद करण्यात आलेले आहेत .

या सुविधामुळे पेन्शन धारकांना अधिकच फायदा होणार आहे . सदर प्रणालीमुळे आता पेन्शन धारकांना पडताळीणीकरीता बँकेत जाण्याची आवश्यकता राहणार नसल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment