जुनी पेन्शन लागु करणेबाबत तपासणी समितीचे गठण ; शासन निर्णय निर्गमित दि.13.08.2024

Spread the love

E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ old pension scheme tapasani samiti ] : राज्य शासनांचे मा.मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 22 जुलै 2024 रोजी संपन्न झालेल्या बैठकीमध्ये , उपस्थित करण्यात आलेल्या विधान परिषद सदस्य यांनी ऐनवेळचा विषय म्हणून दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पुर्वी टप्पा अनुदानावर असणाऱ्या व दिनांक 01 नोव्हेबर 2005 नंतर 100 टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक – कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणे संदर्भात विषय मांडण्यात आला होता .

सदरच्या विषयी चर्चेदरम्यान विशाल सोळंकी , तत्कालीन आयुक्त ( शिक्षण ) महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अध्यक्षतेखालील सम्यक विचार समिती ने सादर केलेल्या अहवालातील आर्थिक भाराबाबत सादर करण्यात आलेल्या माहितीस अनुसरुन बैठकीस उपस्थित विधान परिषद सदस्या मार्फत आक्षेप घेण्यात आला होता .

त्यास अनुसरुन आलेल्या शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या बाबीत आयुक्त ( शिक्षण ) यांच्या अध्यक्षतेखाली सम्यक विचार समितीने सादर केलेल्या आर्थिक भाराबाबत पुन : तपासणी करण्यासाठी समितीचे गठण करण्याचे निदेश देण्यात आले होते .

त्याचप्रमाणे आयुक्त ( शिक्षण ) यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी समिती गठित करण्याची बाब शासनांच्या विचाराधीन होती . यानुसार श्री.सुरज मांढरे ( भा.प्र.से ) आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण करण्यास मान्यता देण्यात येत आहे .

सदर समितीने कार्यकक्षांमध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक – कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा प्रत्यक्ष दिनांक , अशा शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या , त्यानुसार सेवानिवृत्तविषयक लाभ अदा करावयाचा असल्यास , प्रत्यक्षात येणारा खर्च , संपुर्ण खर्चाचा वर्षनिहाय तपशिल , सेवानिवृत्त विषयक प्रत्येक लाभविषय खर्चाचा वर्षनिहाय तपशिल  या बाबींची तपासणी करुन अहवाल 01 महिन्यांच्या आत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

Leave a Comment