जुनी पेन्शन योजनेसाठी शिर्डी येथे राज्य महा अधिवेशन ; लाखोच्या संख्येने कर्मचारी होणार सहभाग !

Spread the love

E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ old pension scheme state maha-adhiveshan] : राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणी करिता राज्यामध्ये विविध आंदोलने केली जात आहेत . नुकतेच राज्य सरकारने केंद्र सरकारने लागू केलेली युनिफाईड पेन्शन स्कीम जशाच्या तसे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्यात आला आहे .

परंतु सदर युनिफाईड पेन्शन स्कीमला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून विरोध होत असून , 1982-84 ची जुनी पेन्शन योजना सरसकट लागु करण्याची मागणी , करिता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी शिर्डी येथे राज्य महा-  अधिवेशन आयोजित करण्यात आली आहेत . सदर अधिवेशनाला लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याकरिता कर्मचारी संघटनेकडून राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना आव्हान करण्यात आली आहेत .

दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी शिर्डी  ( जि. अहमदनगर ) या ठिकाणी पेन्शन राज्य महा – अधिवेशन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत , सदर संघटनाकडून पूर्वीपासूनच जुनी पेन्शन योजना लागू व्हावी अशी मागणी आहे .

नवीन एकीकृत ( युनिफाईड ) पेन्शन योजनेमध्ये , देखील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे लाभ मिळणार नसल्याचा दावा कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे . तसेच सदर योजनेमध्ये काही छुप्या अटी शर्ती असणार असल्याची शक्यता कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे . कारण याबाबत अधिकृत अधिसूचना निर्णय निर्गमित करण्यात आलेला नाही , यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एक प्रकारचे संभ्रम निर्माण करून , सरकारला वेळ टाळायचे आहे , असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे .

जुनी पेन्शन योजना मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून व त्यावर चालू महागाई भत्ता मिळतो , यामुळे जुनी पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अधिक फायदेशीर ठरते , यामुळेच कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजनास पूर्ववत लागू करण्याची मागणी होत आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment