E-marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Old Pension scheme & new unified pension scheme difference ] : जुनी पेन्शन योजना व नविन युनिफाइट पेन्शन योजनांमध्ये नेमका कोणता फरक आहे ? ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
जुनी पेन्शन योजनांमध्ये कर्मचारी आपले योगदान नाही देत तर युनिफाईट मध्ये कर्मचारी 10 टक्के ( मुळ वेतन + महागाई भत्ताच्या ) योगदान द्यावे लागते . जुनी पेन्शनसाठी किमान 20 वर्षे सेवा पुर्ण होणे आवश्यक आहे , तर युनिफाईट पेन्शन मध्ये किमान 10 वर्षे सेवा पुर्ण होणे आवश्यक असेल . जुनी पेन्शन योजनांमध्ये 50 टक्के पेन्शन मुळ वेतन व महागाई भत्ता सोबत हमी दिली जाते .
तर युनिफाईट मध्ये वयाच्या 60 वर्षे पुर्ण झाल्यानंतरच सदरचा लाभ मिळतो . जुनी पेन्शन योजनांमध्ये विशिष्ट वय वाढीनंतर पेन्शन मध्ये वृद्धी होते , तर युनिफाईट मध्ये पेन्शन वृद्धीची कोणतीही तरतुद नाही . जुनी पेन्शन मध्ये वेतन आयोगानुसार पेन्शन मध्ये वृद्धी होते , तर युनिफाईट मध्ये तशी तरतुद नमुद नाही .
जुनी पेन्शन योजनांमध्ये किमान पेन्शन 9000/- रुपये + महागाई भत्ता लागु आहे , तर युनिफाईट मध्ये किमान 10,000/- रुपये पेन्शन ( किमान 10 वर्षे सेवा करीता ) . जुनी पेन्शन योजनांमध्ये भविष्य निर्वाह निधी योजना लागु आहे , तर युनिफाईड मध्ये भविष्य निर्वाह निधी योजना लागु नाही .
एकंदरित युनिफाईट पेन्शन योजनांमध्ये राष्ट्रीय पेन्शन योजनांच्या तुलनेत कर्मचाऱ्यांसाठी लाभदायक सुधारणा करण्यात आलेले आहेत , परंतु जुनी पेन्शनच्या तुलनेत अनेक सुधारणा करणे अपेक्षित आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.16.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !
- राज्यात या 11 दिवशी पडणार मुसळधार पाऊस ; ” या” जिल्ह्यांना अलर्ट जारी – पंजाबराव यांचा नवा हवामान अंदाज ..
- दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असताना निधन झालेल्या / होणाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सुधारित करणेबाबत महत्वपुर्ण GR .
- पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार बातमीबाबत , राज्य शासनांकडून खुलासा !
- राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ; सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ..