केंद्रीय कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% पेन्शन देणारी UPS योजना नेमकी आहे तरी काय ? जाणून घ्या सविस्तर अधिसूचना ..

Spread the love

E- marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ new unified pension scheme ] : केंद्र सरकारने काल दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी अधिसूचना काढून केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन युनिफाईड पेन्शन योजनेला मंजुरी देण्यात आली आहे , सदर योजनेमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना शेवटच्या मूळ वेदनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून निवृत्तीनंतर दिली जाणार आहे सदर योजनेचे काही ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात .

सदर योजनेमध्ये 25 वर्षाच्या किमान पात्रता सेवेसाठी सेवानिवृत्ती होण्यापूर्वी गेल्या 12 महिन्यात काढलेल्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% हे वेतन कमीत कमी दहा वर्षांच्या सेवेपर्यंत कमी सेवा कालावधीसाठी प्रमाणानुसार मिळणार आहेत . त्याचबरोबर खात्रीशीर कौटुंबिक निवृत्तीवेतन 60% कर्मचाऱ्यांच्या तिच्या निधनापूर्वी निवृत्ती बद्दल दिली जाणार आहे .

सदर योजनेअंतर्गत कर्मचार्‍यांनी किमान दहा वर्षे सेवा केली असेल तर अशा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर किमान 10,000/-  (दहा हजार)  रुपये पेन्शनची हमी देण्यात आली आहे . यामुळे कमी वेतनश्रेणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखिल सदर पेन्शन योजनेमध्ये सुरक्षा कवच प्राप्त होणार आहे .

यामुळे सदर योजनेमध्ये सेवानिवृत्तीनंतर खात्रीशीर पेन्शन त्याचबरोबर कुटुंब निवृत्तीवेतन खात्रीशीर मिळण्याची हमी सदर योजनेमध्ये असणार असल्याची नमूद करण्यात आली आहे . तसेच सदर योजनेअंतर्गत राष्ट्रीय पेन्शन योजना मध्ये मिळणारी कमी पेन्शनच्या तुलनेमध्ये अधिक पेन्शन मिळणार आहे,  तसेच मृत्यूनंतर 60% कुटुंब निवृत्ती वेतनाची हमी मिळणार आहे .

हे पण वाचा : बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये गट क संवर्गातील 1846 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

सदरची योजना लागू करण्यापूर्वी केंद्र सरकारने देशातील विविध कर्मचारी संघटना त्याचबरोबर राज्यातील जवळपास सर्व राज्यासोबत 100 पेक्षा अधिक बैठका घेण्यात आले असून , भारतीय रिझर्व बॅंक तसेच जागतिक बँकेसह सर्वांशी सल्लामसलत केल्यानंतर , सदर पेन्शन योजनास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment