IPO : शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करण्याची मोठी सुवर्णसंधी ; या बड्या कंपन्याचे IPO खरेदी साठी ओपन .

Spread the love

E-marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ new ipo share market launch see detail ] : शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करु इच्छिणाऱ्यांसाठी गुंतवणुक करण्याची आत्ताची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे . यांमध्ये देशातील बड्या कंपन्या रिंगणात आहेत , तर गुंतवणुक करणाऱ्यांनी ऑनलाईन शेअर मार्केट ॲप्सच्या माध्यमातुन सदर गुंतवणुक करु शकता .

Bajaj Housing Finance : देशात बजाज ही देशातील मोठी कंपनी आहे , बजाज समुदायाचे बजाज हाऊसिंग फायनान्स या कंपनीचे आयपीओ बाजारांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असुन गुंतवणुकदारांना उद्या दिनांक 11 सप्टेंबर पर्यंत सदर शेअर मध्ये गुंतवणुक करता येणार आहेत . या शेअरची अंदाजित किंमत ही 66-70 रुपये असे असणार आहेत , तर कंपनीचे सदरचा आयपीओ घेण्याकरीता 14124/- रुपये म्हणजेच 214 शेअर मिळणार आहेत .

याशिवाय Tolins Tyres व Kross या दोन कंवनीचे आयपीओ  उद्या दिनांक 11 सप्टेंबर 2024 पर्यंत सायंकाळी 4.50 वाजेपर्यंत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत , तर P N Gadgil Jewellery या कंपनीचा आयपीओ दिनांक 12 सप्टेंबर 2024 पर्यंत सायंकाळी 4.50 वाजेपर्यंत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे .

हे पण वाचा : भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !

आगामी काळातील ( Upcoming ) आयपीओ ( IPO ) : आगामी काळांमध्ये 11 बड्या कंपन्यांच्या आयपीओ खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत , यामुळे गुंतवणुकदारांनी गुंतवणुकीसाठी तयार रहावेत . आगामी काळातील आयपीओ यादी पुढीलप्रमाणे पाहुयात ..

  • Fabindia
  • OYO
  • BoAt
  • Bajaj Energy
  • Mobikwik
  • Studds Accessories
  • Arohan Financial
  • Snapdeal
  • Droom
  • Swiggy
  • Hyudai Motor india

Leave a Comment