पुढील 4 दिवस दि.10 सप्टेंबर पर्यंत राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस ; जाणुन घ्या नविन अंदाज !

Spread the love

E-marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Maharashtra state rain update upto date 10 September ] : राज्यात पुढीलप 4 दिवस म्हणजेच दिनांक 10 सप्टेंबर 2024 पर्यंत काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . हवामान खात्याचे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी अंदाजानुसार राज्यांमध्ये पुढील 4 दिवस हवामान अंदाज नेमका कसा असणार ? याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे घेवूयात ..

मागील आठवड्यांमध्ये राज्यात चांगला पाऊस झाला आहे , तर मागील 3-4 दिवस पावसाने विश्रांती घेतली होती , तर आता पुन्हा पाऊस राज्यात सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे . आजपासुन ते दिनांक 10 सप्टेंबर पर्यंत राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार , याबाबत सविस्तर अंदाज पुढीप्रमाणे पाहुयात .

मराठवाडा विभाग : हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मराठवाडा विभागामध्ये जालना , हिंगोली , छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये दिनांक 10 सप्टेंबर 2024 पर्यंत मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .

कोकण विभाग : कोकणांमध्ये सिंधुदुर्ग , रायगड , पालघर , मुंबई , मुंबई उपनगर , रत्नागिरी , ठाणे या जिल्ह्यांमध्ये दिनांक 10 सप्टेंबर 2024 पर्यंत अति-जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . म्हणजेच कोकणांमध्ये पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .

विदर्भ : विदर्भातील भंडारा , चंद्रपुर , गोंदिया , नागपुर , गडचिरोली , अमरावती , वर्धा , बुलढाणा , अकोला , यवतमाळ , वाशिम या विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .

हे पण वाचा : राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट , जॉइन व्हा!

पश्चिम महाराष्ट्र विभाग : पश्चिम महाराष्ट्र विभागातील सोलापुर , सांगली , सातारा  , कोल्हापुर , अहमदनगर , पुणे , नाशिक या 07 जिल्ह्यांमध्ये अति जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त व्यक्त करण्यात आलेला आहे .

खानदेश : खानदेश विभागांमध्ये जळगाव , धुळे , नंदुरबार या 03 जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .

Leave a Comment