राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.16.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !

Spread the love

E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra state employees old pension scheme gr ] : राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी राज्य शासकीय अधिकारी /कर्मचारी यांच्याकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . सदर शासन निर्णयानुसार दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरतीची जाहिरात / अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना ( Old pension) लागू करणे संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पद भरतीची जाहिरात तसेच अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेमध्ये दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या राज्य शासकीय अधिकारी तसेच कर्मचारी यांना केंद्र सरकारच्या धरतीवर जुनी निवृत्तीवेतन ( Old pension ) लागू करण्यात आली आहे .

वरील प्रकरणी केंद्र सरकारच्या निर्णयानुसार एक वेळ पर्याय ( One time option ) म्हणून सदर अधिकारी /  कर्मचारी यांना जुनी निवृत्तीवेतन योजना ( Old pension scheme ) लागू करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे . याकरिता प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने सदर अधिकारी / कर्मचारी यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे .

यामध्ये राज्य शासनाच्या जलसंपदा विभाग अंतर्गत कार्यरत अधीक्षक अभियंता  (स्थापत्य ) या पदावर सद्यस्थितीत कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 2 फेब्रुवारी 2024 मधील तरतुदीप्रमाणे महाराष्ट्र राज्य नागरी सेवा नियम 1982 त्याचबरोबर महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .

यामध्ये जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांच्या समावेश असून सदर कर्मचाऱ्यांचा प्राप्त आवेदनुसार सदर निर्णय घेण्यात आलेला आहे . सदर प्रकरणी राष्ट्रीय निवृत्तीवेतन खात्यातील राज्य शासनाच्या हिच्याची रक्कम देय / अनुदेय व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्याचे निर्देश देण्यात आली आहे.

Leave a Comment