E-marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ maharashtra state employee vishesh bal sangopan leave ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष बाल संगोपन रजा मंजूर करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभाग मार्फत दिनांक 21 नोव्हेंबर 2016 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार विकलांग व्यक्तींकरीता अधिनियम 1995 मधील कलम – 13 उपकलम ( १) नुसार स्थापित करण्यात आलेल्या राज्य समन्वय समितीची शिफारस विचारात घेवून राज्य शासकीय महिला कर्मचाऱ्यांस तसेच पुढे नमुद केल्यानुसार अपत्य असून पत्नी नसलेल्या शासकीय पुरुष कर्मचाऱ्यांस म्हणजेच अशा अपत्याच्या वडीलांदेखिल संपुर्ण सेवेत 730 दिवसांच्या कमाल मर्यादेत विशेष बाल संगोपन रजा मंजूर करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे .
विकलांगता मध्ये अंधत्व , क्षीण दृष्टी , बरा झालेला कुष्ठरोग , श्रवण शक्तीतील दोष , चलन – चलन विषयक विकलांगता , मानसिक आजारपण सदर विकलांगता मधील किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त आहे असे वैद्यकीय प्राधिकरणाने प्रमाणित केले असणे आवश्यक असेल .
सदर रजेचे अटी / शर्ती : अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल , सदर रजा हक्क म्हणून मागता येणार नाही , सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पुर्व मान्यतेनेच सदर रजा घेता येणार आहे . सदर रजा विकलांग अपत्याच्या वयाच्या 22 वर्षापर्यंत घेता येणार आहे . तसेच सदर रजा पहील्या 02 हयात अपत्याकरीता लागु असणार आहे .
हे पण वाचा : पेन्शनधारकांना दि.01.01.2025 पासुन अत्यंत महत्वपुर्ण नविन सुविधा लागु होणार !
सदर रजा एकाहुन अधिक हत्प्यांमध्ये तसेच एका आर्थिक वर्षात तीन पेक्षा अधिक नाही अशा मर्यादेत घेता येणार आहे . तसेच विशेष बाल संगोपन रजेचा हिशोब सेवापुस्तकांमध्ये ठेवण्याचे निर्देश आहेत . तसेच विकलांग अपत्य शासकीय कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे , अशा प्रकारचे प्रमाणपत्र शासकीय कर्मचाऱ्यांने सादर करणे अनिवार्य असणे आवश्यक असेल .
सदरचे आदेश हे मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्थाच्या प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व कृषी व बिगर कृषी विद्यापीठे व त्यांना संलग्न असणारी महाविद्यालये यामधील पुर्णकालिक शिक्षक व शिक्षकेत्तर महिला कर्मचारी यांना देखिल लागु असणार आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.16.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !
- राज्यात या 11 दिवशी पडणार मुसळधार पाऊस ; ” या” जिल्ह्यांना अलर्ट जारी – पंजाबराव यांचा नवा हवामान अंदाज ..
- दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असताना निधन झालेल्या / होणाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सुधारित करणेबाबत महत्वपुर्ण GR .
- पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार बातमीबाबत , राज्य शासनांकडून खुलासा !
- राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ; सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ..