राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणेबाबत , शासन अधिसुचना निर्गमित दि.29.08.2024

Spread the love

E-marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee transfer shasan adhisuchana ] : महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणेबाबत , राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन अधिसुचना निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदरचा अध्यादेश महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 यात सुधारण करण्याकरीता काढण्यात आला आहे . ज्या अर्थी राज्याच्या विधान मंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालु नाही . व ज्या अर्थी यांमध्ये यापुढे दिलेल्या प्रयोजनां करीता महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन 2006 चा तसेच शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 यात आणखी सुधारणा करण्यासाठी ..

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबाबत , त्यांची खात्री पटली आहे . त्या अर्थी आता , भारताच्या संविधानांच्या अनुच्छेद 213 खंड ( 1 ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र राज्यपाल , याद्वारे पुढील अध्यादेश प्रख्यापित करीत आहेत .

सदरचा अध्यादेशास महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध ( सुधारणा ) अध्यादेश 2024 असे म्हणावे असे नमुद करण्यात आले आहेत .

तसेच महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 हा शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन करण्यासाठी व शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध करण्यासाठी तरतुद करण्याकरीता अधिनियमित करण्यात आला आहे .

या नुसार राज्यातील भारतीय सेवेतील अधिकारी आणि अ , ब व क गटातील राज्य शासनाचे सर्व सेवक अथवा कर्मचारी यांच्याकरीता एखाद्या पदावर असण्याचा सामान्य कालावधी तीन वर्षांचा असेल अशी तरतुद करण्यात आली आहे , उक्त अधिनियमाच्या कलम 4 मध्ये बदलीच्या पदावधीची तरतुदत केली असून , त्यातील पोट कलम ( 4 ) मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या , सामान्यपणे , वर्षातुन एकदाच एप्रिल अथवा मे महिन्यात करण्यात येतील अशी तरतुद करण्यात आलेली आहे .

हे पण वाचा : कर्मचाऱ्यांना महत्वपूर्ण : वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून “या” माध्यमाचे आदेश पाळणे बंधनकारक नाहीत .

तसेच भारतीय निवडणुक आयोगाने सार्वत्रिक लोकसभा निवडणुक 2024 यासाठी दिनांक 16 मार्च 2016 पासुन आदर्श आचार संहिता लागु केली होती , व तो दिनांक 04 जुन 2024 पर्यंत अंमलात होती .

आदर्श आचार संहिता अंमलबजावणीमुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या नव्हत्या , त्यामुळे सदर अधिनियमांच्या कलम 4 मध्ये सुयोग्य सुधारणा करुन , सर्वसाधारण बदलीसाठीचा उक्त कालावधी दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढविणे इष्ट वाटते असे नमुद करण्यात आले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment