सत्ता स्थापनेनंतर पहिल्याच कॅबिनेट मध्ये राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करण्याचे वचन !

Spread the love

E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee old pension scheme cabinet nirnay vachan ] : सत्ता स्थापन झाल्याच्या नंतर पहिल्याच कॅबिनेट मध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ( Old Pension ) योजना जशाच्या तशी लागु करण्याचे वचन काल दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी शिर्डी येथे झालेल्या पेन्शन महाअधिवेशन दरम्यान काँग्रेसचे नेते नाना पटोले व शिवसेना ( उ.बा.ठाकरे ) पक्षाचे अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना दिले आहेत .

राज्यात काल दिनांक 15 सप्टेंबर रोजी शिर्डी येथे महा-अधिवेशन झाले यावेळी , राज्यातील सर्वच जिल्ह्यातून लाखो कर्मचारी उपस्थित होते .कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन (old pension ) पेन्शन हवी आहे , कारण नविन पेन्शन योजनांमध्ये तसेच सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना असो कि युनिफाईड पेन्शन असो या पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन अथवा इतर भत्ते दिले जात नाहीत .

तसेच नविन पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान कायम ठेवण्यात आलेले आहेत , यामुळे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे सदर सुधारित पेन्शन योजनांमध्ये फायदा होत नाहीत . यामुळे कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन करीता सन 2005 पासुन वेळोवेळी आंदोलने , मोर्चा काढून आपली मागणी मान्य करुन घेण्यासाठी लढा देत आहेत .

हे पण वाचा : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढीचा प्रस्तावास तुर्तास मंजुरी नाही ..

पहिल्याच कॅबिनेट बैठकीत जुनी पेन्शनचा निर्णय घेणार : महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यास , सत्ता स्थापने नंतरच्या पहिल्याच कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीमध्ये , राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ( Old Pension ) योजना जशाच्या तशी लागु करण्याचे वचन उद्धव ठाकरे व नाना पटोले यांच्या कडून देण्यात आले आहेत .

दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी शिर्डी येथे झालेल्या कर्मचाऱ्यांच्या महा-अधिवेशन दरम्यान उद्धव ठाकरे व नाना पटोले यांनी प्रमुख उपस्थित लावुन याबाबत आपले मत व्यक्त केले  . यावेळी कर्मचाऱ्यांकडून देखिल चांगला प्रतिसाद मिळाला .

Leave a Comment