E-marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee new pension , Vadhiv hra & da news ] : सरकारी कर्मचाऱ्यांना नविन पेन्शन योजना लागु करण्यात आलेली आहे , तसेच आता पुढील महिन्यांपासुन वाढीव महागाई भत्ता व वाढीव घरभाडे भत्ता लागु केली जाण्याची मोठी अपडेट समोर येत आहेत .
नविन पेन्शन योजना ( New Pension Scheme ) : केंद्र सरकारने लागु केलेली युनिफाईड पेन्शन योजना बाबत केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे , सदर योजना राज्य कर्मचाऱ्यांना जश्याच्या तसे लागु करणेबाबत , मोठा निर्णय राज्य शासनांकडून घेण्यात आलेला आहे . या निर्णयानुमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनापेक्षा अधिक लाभ मिळणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आलेला आहे .
वाढीव महागाई भत्ता : केंद्रीय कामगार विभागाकडुन माहे जुन पर्यंतचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत , तसेच दरवर्षी केंद्र सरकारकडून डी.ए वाढीबाबतचा अधिकृत्त निर्णय माहे सप्टेंबर महिन्यात घेतला जातो . यामुळे माहे सप्टेंबर महिन्यांच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत वाढीव डी.ए चा निर्णय घेण्यात येईल . व पुढील महिन्यांपासुन प्रत्यक्ष लागु करण्यात येईल . म्हणजेच महागाई भत्ताचे दर 50 टक्के वरुन 53 टक्के पर्यंत वाढणार आहेत .
वाढीव घरभाडे भत्ता ( HRA ) : महागाई भत्ता 50 टक्के पेक्षा अधिक , सातवा वेतन आयोग नियोजनानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव दराने घरभाडे भत्ता लागु करण्यात येईल . म्हणजेच डी.ए वाढीनंतर घरभाडे भत्तामध्ये आपोआप वाढ होणार आहे .
सध्यस्थिती सरकारी कर्मचाऱ्यांना वास्तव्याच्या ठिकाणानुसार 27 टक्के , 18 टक्के , 9 टक्के या प्रमाणात एचआरए मिळतो , आता माहे जुलै 2024 पासुन डी.ए वाढीच्या निर्णयानंतर अनुक्रमे 30 टक्के , 20 टक्के , 10 टक्के अशी घरभाडे भत्ता मध्ये वाढ होणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.16.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !
- राज्यात या 11 दिवशी पडणार मुसळधार पाऊस ; ” या” जिल्ह्यांना अलर्ट जारी – पंजाबराव यांचा नवा हवामान अंदाज ..
- दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असताना निधन झालेल्या / होणाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सुधारित करणेबाबत महत्वपुर्ण GR .
- पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार बातमीबाबत , राज्य शासनांकडून खुलासा !
- राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ; सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ..