राज्यातील कर्मचाऱ्यांना HRA भत्याला मुकावे लागणार ; निधी अभावी कर्मचाऱ्यांना होणार त्रास – विजय वडेट्टीवार .

Spread the love

E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee HRA news ] : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना निधी अभावी घरभाडे भत्याला मुकावे लागणार असल्याची शक्यता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल दिनांक 10 सप्टेंबर रोजी बोलताना सांगितले .

यावेळी त्यांनी नमुद केले कि , राज्य शासनांने सुरु केलेली माझी लाडकी बहीण योजनांमुळे अन्य शासकीय योजनांचा पुर्णपणे खेळ खोळंबा झालेला , दुसऱ्या योजनांकरीता आवश्यक निधीच पुरवठा केला जात नाहीत , तर इतर योजनांच्या निधी लाडकी बहीण योजनांकडे वर्ग केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे .

यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी आवश्यक निधी मिळत नसल्याचे देखिल आरोप राज्यातुन होताना दिसून येत आहेत . विरोधी पक्षनेते यांनी सांगितल्यानुसार , सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी सरकारकडे आवश्यक पैसा नाही तर , सदरचा निधी देखिल लाडकी बहीण योजनांसाठी वापरला जात असून , राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता कापुन पगार दिला जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे .

हे पण वाचा : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार सोपविणेबाबत सुधारित शासन निर्णय !

तसेच यावेळी नमुद करताना सांगितले कि , अतिवृष्टी मुळे राज्यात शेतकऱ्यांना मदत निधी देण्या ऐवजी सरकारचे कृषीमंत्री सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याचा आरोप केला आहे . अशा परिस्थितीमध्ये कोणाकडे मदत मागायची असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे .

लाडकी बहीण योजनेचा निवडणुकीमध्ये विद्यमान सरकारला अधिक असा फायदा होणार नाही , तर यावेळी महाविकास आघाडी सरकारला अधिक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment