E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee finance department imp Shasan nirnay ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत दि.01.11.2005 नंतर सेवेत रुजु झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनांच्या वित्त विभागांकडुन दिनांक 09 मे 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
ज्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागु आहे , अशा कर्मचाऱ्यांनी जर आपल्या पदाचा राजीनाम दिला असेल तर अशांना राज्य शासन सेवेत पुन्हा घेण्याची विनंती केली असल्यास , त्यांना सदर निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेल्या तरतुदींच्या अधिन राहुन पुन्हा शासन सेवेत घेण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निश्चित करण्यात येत आहेत .
जर एनपीएस धारक कर्मचाऱ्यांनी त्याची कार्यक्षमता अथवा सचोटी या व्यक्तीरिक्त अन्य काही सक्तीच्या कारणास्तव राजीनामा दिला असल्यास , व त्याने आपला राजीनामा देणे ज्या परिस्थितीमुळे भाग पडेल त्या परिस्थितीमध्ये महत्वाचा बदल झाल्याने त्याने राजीनामा मागे घेण्याची विनंती करणे आवश्यक असेल .
तसेच सदर राजीनामा अंमलात येण्याची दिनांक व राजीनामा मागे घेण्याबद्दल विनंती केल्याची दिनांक यांच्या दरम्यानच्या काळांमध्ये सदर संबंधित व्यक्तींची वर्तवणूक कोणत्याही प्रकारचे अनुचित असता कामा नयेत असे नमुद करण्यात आलेले आहेत .
तसेच राजीनामा परत घेतल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांस पदस्थापना देताना त्याचे पुर्वीचे अथवा समकक्ष पद अस्तित्वात असणे आवश्यक असणार आहेत . परंतु जर सदर कर्मचाऱ्यांने एखाद्या वाणिज्यिक कंपन्यांमध्ये अथवा इतर शासकीय मालकीच्या अथवा शासन नियंत्रणाखालील कंपनी , महामंडळ अथवा शासन सहाय्य असणाऱ्या संस्था / कंपन्या मध्ये नेमणुक होण्याच्या दृष्टीने शासन सेवेतील पदाचा राजीनामा दिला असल्यास , सदर कर्मचाऱ्याचा राजीनामा मागे घेण्यात येवू नयेत असे नमुद करण्यात आले आहेत .
सदर निर्णय हा अस्थायी कर्मचाऱ्यांकरीता लागु राहणार नसल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत , तसेच सदरचा निर्णय हा सदर निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासुन लागु राहणार असल्याचे नमुद असून इतर विभागांना योग्य त्या फेरफारांसह लागु होईल असे नमुद करण्यात आले आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.16.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !
- राज्यात या 11 दिवशी पडणार मुसळधार पाऊस ; ” या” जिल्ह्यांना अलर्ट जारी – पंजाबराव यांचा नवा हवामान अंदाज ..
- दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असताना निधन झालेल्या / होणाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सुधारित करणेबाबत महत्वपुर्ण GR .
- पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार बातमीबाबत , राज्य शासनांकडून खुलासा !
- राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ; सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ..