E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee additional charges shasan nirnay ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार सोपविणेबाबत , राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 05.09.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नागरी सेवा नियम 1981 मधील नियमांनुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडे त्याच्या पदाच्या व्यतिरिक्त अन्य रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात येतो , अशा रिक्त असणाऱ्या पदाचा अतिरिक्त कार्यभार एकाच प्रशासकीय विभाग अंतर्गत , तसेच प्रशासकीय सोय व निकड लक्षात घेवून कार्यक्षम अधिकारी / कर्मचाऱ्यांकडे सोपविण्यात यावा , असे नमुद करण्यात आलेले आहेत .
ज्या ठिकाणी अधिकारी / कर्मचारी उपलब्ध नसतील त्या संबंधित पदाला लगत असणाऱ्या निम्न संवर्गातील सर्वात ज्येष्ठ असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात यावा असे नमुद करण्यात आलेला आहे . तसेच काही बाबींमुळे ज्येष्ठ अधिकारी / कर्मचारी यांना डावलून नंतरच्या व्यक्तीला अतिरिक्त कार्यभार द्यावयाचा असेल तर सर्वात ज्येष्ठ व्यक्ती अतिरिक्त कार्यभारासाठी का अपात्र आहे त्याची लेखी कारणे अभिटिप्पणीत नमुद करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !
तसेच अतिरिक्त ( Additional Charges ) देताना अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या त्याच्या मुळ पदाचे कर्तव्ये व जबाबदारीसह , त्याच्यावर अतिरिक्त कार्यभार सोपवलेल्या पदाची कर्तव्ये तसेच जबाबदाऱ्या पार पाडू शकेल याीच संबंधितांनी खातरजमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तसेच विभागीय चौकशी सुरु असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांस अतिरिक्त कार्यभार दिल्याने त्यांच्या स्वत : च्या विभागीय चौकशीवर प्रभाव पडण्याची अथवा विभागीय चौकशीमध्ये अडथळा आणण्याची शक्यता असल्यास , अशा कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात येवू नयेत असे नमुद करण्यात आलेले आहेत .
त्याचबरोबर अतिरिक्त वेतन / विशेष वेतन देणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन आदेशानुसार प्रशासकीय विभागांनी कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.16.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !
- राज्यात या 11 दिवशी पडणार मुसळधार पाऊस ; ” या” जिल्ह्यांना अलर्ट जारी – पंजाबराव यांचा नवा हवामान अंदाज ..
- दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असताना निधन झालेल्या / होणाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सुधारित करणेबाबत महत्वपुर्ण GR .
- पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार बातमीबाबत , राज्य शासनांकडून खुलासा !
- राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ; सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ..