राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक उपाय योजनांची कोटेकोरपणे अंमलबावणीबाबत GR निर्गमित ..

Spread the love

E-marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state all student Suraksha upay shasan nirnay ] : राज्य शासन सेवेतील सर्व शाळांमधील विद्यार्थी / विद्यार्थींच्या सुरक्षा विषयक उपाय योजनांची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबर त्यांच्या सुरक्षेतच्या मुद्दा हा अत्यंत महत्वपुर्ण आहे , अलिकडच्या काळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित प्रकार घडले आहेत , त्या अनुषंगाने सदर शासन निर्णयानुसार विविध उपाय योजना राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे , विविध उपाय योजना पुढीलप्रमाणे आहेत .

शाळा व परिसरांमध्ये CCTV कॅमेरे बसविणे : शाळा व परिसरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . सदर बाब राज्यातील सर्व शासकीय , खाजगी शाळांना प्राधान्यांनी लागु करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा : गट क संवर्गातील 1846 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने : यांमध्ये नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच बाह्य स्त्रोता द्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने ज्या नेमणुमका केल्या जातात जसे कि सुरक्षारक्षक , सफाईगार , मदतनिस , स्कुल बसचे चालक इ.बाबत संबंधित व्यक्तीच्या पार्श्वभुमीची काटेकोर तपासणी शाळा व्यवस्थापन मार्फत होणे आवश्यक असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .

तक्रार पेटी : शाळेमध्ये तक्रार पेटी असणे अनिवार्य असणे आवश्यक असेल , असे नमुद करण्यात आले आहेत .सखी सावित्री समितीबाबतच्या तरतुदींचे अनुपालन करण्याचे निर्देश , तसेच विद्यार्थी सुरक्षा समिीचे प्रस्तावित गठन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समितीचे गठण अशा उपाय योजनांची अमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

Leave a Comment