राज्यातील शेतकरी व सर्वसामान्यांसाठी दि.25 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 10 महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !

Spread the love

E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ maharashtra shasan cabinet nirnay about farmer & citizen ] : काल दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी राज्य शासनांच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक संपन्न झाली , सदर बैठकीमध्ये राज्य शासनांकडून शेतकरी व सर्वसामान्यांसाठी 10 मोठे महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत .

01.राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा योजनेचा विस्तार : राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी दिवसा देखिल अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्याकरीता राज्याच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चा विस्तार करुन त्याची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे . या योजनांच्या माध्यमातुन राज्यातील कृषी पंप ग्राहकांना दिवसा देखिल 100 टक्के क्षमतेने वीजपुरवठा करण्याचे उद्देश आहेत .

02.मुंबई मधील रखडलेली झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जलदगतीने पुर्ण करणार : मुंबई महानगरातील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प झपाट्याने पुर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला अहो .या अंतर्गत एकुण 2 लाख 18 हजार 931 सदनिका नव्याने बांधण्यात येणार आहेत .

03.बार्टी मधील विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती : बार्टीच्या पात्र असणाऱ्या एकुण 763 विद्यार्थ्यांना संपुर्ण अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे , सदर योजना अंतर्गत सन 2022 च्या विद्यार्थ्यांना 50 टक्के अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय यापुर्वी घेण्यात आलेला होता , महाज्योती व सारथी प्रमाणे सदर विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करुन शपथपत्र घेवून विद्यार्थ्यांना 100 टक्के अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

हे पण वाचा : लाडकी बहिणींकरीता आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट ; सरकारकडून मोठ्या घोषणा , जाणून घ्या सविस्तर ..

04.ज्येष्ठ नागरिक महामंडळाची स्थापना : सदर मंत्रीमंडळ बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिक महामंडळाची स्थापना करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . या निर्णयामुळे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आजारपण , बेरोजगारी , म्हातारपण , विकलांगता अशांपासुन संरक्षण मिळणार आहे , त्यांचा वृद्धापकाळ सुसह्य होण्यास मदत होणार आहे .

05.ठाणे येथिल क्लस्टर योजनांसाठी महाप्रित करीता 5,000/- हजार कोटी उभारण्यात येणार .

06.नार-पार गिरणा जोड प्रकल्पास मान्यता देण्यात आली , या योजना अंतर्गत राज्यातील जळगाव , नाशिक जिल्ह्यांस सिंचनाचा मोठा फायदा होणार आहे .

हे पण वाचा : बस महामंडळ मध्ये लिपिक , सहायक , शिपाई , निरीक्षक , वीजतंत्री , प्रभारक इ. पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन ..

07.थकीत देण्याकरीता महावितरणांस कर्ज घेण्यास शासनांची हमी देण्यास मंजुरी .

08.ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामाकरीता 25 कोटी 75 लाख देण्यास मंजुरी ..

09.कळंबोलीतील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा , सेवाशुल्क माफ करण्याचा मोठा निर्णय .

10.पर्याय असणाऱ्या खडकवासला फुरसुंगी बोगदा काढण्यास मंजुरी , यामुळे पुणे भाागात सिंचन तसेच पिण्यासाठी पाण्याची उपलब्ध होणार आहे .

Leave a Comment