राज्यात पुढील दोन दिवस ( दि.29 ऑगस्ट पर्यंत ) पावसाचा जोर अधिकच वाढणार;  हवामान खात्याचा अंदाज !

Spread the love

E-MARATHIPEPAR प्रणिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra rain update upto 29 auguest ] : राज्यामध्ये पुढील दोन दिवस दिनांक 29 ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर अधिकच वाढणार असल्याचा हवामान खात्याने नवा अंदाज व्यक्त केला आहे . मागील आठवड्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढत चालला आहे .

भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राजस्थान मध्य प्रदेश , गुजरात व महाराष्ट्र राज्यातील भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . तर पुढील दोन दिवस दिनांक 29 ऑगस्ट पर्यंत राज्यात अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .कारण बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्याने कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे,  याचा परिणाम म्हणून राज्यात गुजरात पासून येणारे समांतर हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पश्चिम विदर्भ, मराठवाडा ,उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे .

यामध्ये पुणे , सातारा ,रायगड या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस दिनांक 29 ऑगस्टपर्यंत पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे . तर उर्वरित ठिकाणी तुरळक विजेच्या गर्जनासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे . यामुळे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने पुन्हा एकदा जोर वाढवला आहे .

हे पण वाचा : महाराष्ट्र अर्बन सहकारी बँक फेडरेशन लि. अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .

दिनांक 29 ऑगस्ट पर्यंत या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस : राज्यात पुढील दोन दिवस दिनांक 29 ऑगस्ट पर्यंत राज्यातील सातारा, पुणे, रायगड या भागामध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने , सदर जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे . तर राज्यातील रत्नागिरी, रायगड, ठाणे , पालघर , नाशिक, जळगाव या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे . तर नंदुरबार , धुळे,  सिंधुदुर्ग, मुंबई , अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर , बुलढाणा , अकोला या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे .

तर राज्यातील कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ , उत्तर मराठवाडा या भागातील उर्वरित जिल्ह्यामध्ये तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .

शेतकऱ्यांनो नियमित हवामान अंदाज कृषी विषयक माहिती योजना यांची रेग्युलर  अपडेट साठी खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !.

Leave a Comment