E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra rain Update upto 04 sept. 2024 ] : सध्या कालपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये महाभयंकर अतिवृष्टी होत आहे , यामुळे हवामान खात्याकडून काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे . सदरचा पाऊस पुढील दोन दिवस कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे .
हवामान खात्याकडून दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस म्हणजे 4 सप्टेंबर पर्यंत राज्यात अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . यासंदर्भातील माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख श्री.के.एस. होसाळीकर यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे . यामध्ये प्रामुख्याने राज्यात मराठवाडा व विदर्भ विभागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे .
राज्यात कोकण व मध्य महाराष्ट्र मध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . आज पावसाची शक्यता कालप्रमाणे राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . तर दिनांक 4 सप्टेंबर नंतर सदर पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .
राज्यातील लातूर जिल्ह्यामध्ये कालपासून अति मुसळधार पाऊस पडत आहे . तर आज देखील सदर पाऊस कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे . लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसून येत आहे . याशिवाय नांदेड जिल्ह्यामध्ये देखील कालपासून अतिवृष्टी होताना दिसून येत आहे . यामुळे लातूर , नांदेड या जिल्ह्याना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .
सद्यस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्यातील मुदखेड भोकर हदगाव हिमायतनगर किनवट या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अति मुसळधार पाऊस पडत आहे , यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे .
या या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी : वाशिम , बीड , परभणी , हिंगोली , यवतमाळ , जळगाव या जिल्ह्यांमध्ये पावसाने रौद्र धारण केले आहे . सदरच्या पाऊस पुढील दोन दिवस म्हणजे 04 तारखेपर्यंत राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे . यामुळे सदर जिल्ह्यांना दिनांक 4 सप्टेंबर 2024 पर्यंत पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .
शेतकऱ्यांनो नियमित हवामान अंदाज कृषी विषयक माहिती योजना यांची रेग्युलर अपडेट साठी खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !.
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.16.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !
- राज्यात या 11 दिवशी पडणार मुसळधार पाऊस ; ” या” जिल्ह्यांना अलर्ट जारी – पंजाबराव यांचा नवा हवामान अंदाज ..
- दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असताना निधन झालेल्या / होणाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सुधारित करणेबाबत महत्वपुर्ण GR .
- पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार बातमीबाबत , राज्य शासनांकडून खुलासा !
- राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ; सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ..