दि. 28 , 29 व 30 ऑगस्ट रोजीचा राज्यातील पावसाचा आत्ताचा नवा हवामान अंदाज ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

E-marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Maharashtra rain update date 28 to 30 August 2024 ] : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार , आजपासुन दिनांक 30 ऑगस्ट 2024 पर्यंत राज्यातील हवामान अंदाज नेमका कसा असणार ते पुढीलप्रमाणे पाहुयात ..

राज्यांमध्ये सध्या पावसाची जोरदार सुरुवात झालेली आहे , मागील आठवड्यांपासुन राज्यात सर्वत्र ठिकाणी किरकोळ ते अतिजोरदार पावसाची सुरुवात झालेली आहे , राज्यात काल दिनांक 27 ऑगस्ट पासुन राज्यातील पुणे , सातारा  , कोल्हापुर या राज्यात पावसाची दमदार सुरुवात झालेली आहे .

आज दि.28 ऑगस्ट रोजीचा हवामान अंदाज : आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी राज्यांमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज आहे , परंतु राज्यातील कोकण व मराठवड्यांमध्ये पावसाची दमदार सुरुवात होण्याचा अंदाज आहे , तर विदर्भातील भंडारा , गोंदिया , गडचिरोली , अमरावती , वर्धा , चंद्रपुर या जिल्ह्यांमध्ये आज रोजी जोरदार मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे .

हे पण वाचा : केंद्रीय रेशीम मंडळ मध्ये 122 पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

29 व 30 ऑगस्ट रोजीचा हवामान अंदाज : दिनांक 29 व 30 ऑगस्ट रोजी राज्यात विदर्भ व मराठवाडा विभागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे , तर सदर दोन्ही दिवशी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये , किरकोळ ते अति जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . तर राज्यात सदर दिवशी कोकण व मध्य महाराष्ट्र विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे .

तर त्यानंतर राज्यांमध्ये पाउस विश्रांती घेण्याचा अंदाज आहे , तर पुन्हा 9 ते 12 सप्टेंबर या कालावाधीत पावसाची पुन्हा दमदार एन्ट्री होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .

शेतकऱ्यांनो नियमित हवामान अंदाज कृषी विषयक माहिती योजना यांची रेग्युलर  अपडेट साठी खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !.

Leave a Comment