खास शेतकऱ्यांसाठी विविध प्रयोजन करीता कमी व्याजदरात 50 लाख पर्यंत कर्जाची (Loan) सुविधा !

Spread the love

E-marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ maharashtra farmer Loan Facility for various prayojana see detail ] : राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध प्रयोजन करीता कमी व्याजदरांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत तब्बल 50 लाख रुपये पर्यंत कर्जाची सुविधा दिली जात आहे . यांमध्ये शेतकऱ्यांना विविध शेतीविषयक अथवा वैयक्तिक कामाकरीता सदर कर्ज सुविधा दिली जाते .

फार्महाऊस बांधण्यासाठी कर्ज योजना : शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये फार्महाऊस बांधण्यसाठी कर्ज सुविधा उपलब्ध करुन दिली जाते . याकरीता शेतकऱ्यांकडे 2.5 एकर बागायती जमीन असणे आवश्यक असेल . तर अर्जदाराचे किमान वय हे 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक असेल . तर कमाल वय हे 75 वर्षे पर्यंत असणे आवश्यक असेल . यांमध्ये फार्माहाऊसनुसार 10 लाख ते 50 लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जाते .

वाहन खरेदीसाठी कर्ज सुविधा : शेतकऱ्यांना वैयक्तिक दोन / तीन चाकी वाहन तर कृषीकामासाठी चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी वित्त पुरवठा करण्यात येतो , यांमध्ये दोन / तीन चाकी वाहनांकरीता 1.60 लाख रुपये पर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येते . तर चारचाकी वाहनाकरीता कमाल कर्ज 20 लाख रुपये पर्यत दिले जाते .

गोदामाच्या पावत्यांवर वित्तपुरवठा : शेतकऱ्यांच्या गोदामातील ठेवण्यात आलेल्या पिक मालाच्या पावत्याच्या बाजार किंमतीच्या 75 टक्के रक्कम वित्त पुरवठा करण्यात येते . ज्याची कमाल मर्यादा 25 लाख रुपये इतकी आहे .

कृषी पदवीधारकांसाठी कृषी व्यवसायासाठी वित्तपुरवठा : कृषी पदवी उत्तीर्ण उमेदवारास कृषी दवाखाने / कृषी व्यवसाय करण्यासाठी 20 लाख रुपये पर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते .

हे पण वाचा : शेतकऱ्यांसाठी खुशखबर : पुढील 90 दिवसांसाठी सरकारकडून सोयाबीनची रु.4892/- प्रति क्विंटल हमीभावाने खरेदी सुरू !

इतर कर्ज सुविधा : बचत गटांना वित्तपुरवठा , लघुसिंचन करीता कर्ज सुविधा , हाय टेक प्रकल्प करीता कर्ज सुविधा , शेतीचे यांत्रिकीकरण करीता कर्ज सुविधा , पशुसंवर्धन करीता कर्ज सुविधा , फलोत्पादन / वृक्षारोपन उपक्रम करीता कर्ज सुविधा , अल्प व अल्पभुधारक शेतकऱ्यांकरीता जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज सुविधा , किसान क्रेटिड का्र्ड योजना .

अधिक माहितीसाठी व कर्ज घेण्यासाठी : वरील नमुद प्रयोजन करीता https://bankofmaharashtra.in या संकेतस्थळाला भेट द्या अथवा बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या कोणत्याही शाखेला भेट देवून कर्ज घेवू शकता .

शेतकऱ्यांनो नियमित हवामान अंदाज कृषी विषयक माहिती योजना यांची रेग्युलर  अपडेट साठी खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !.

Leave a Comment