राज्य  सरकारी कर्मचारी व इतरांना जुलै 2024 पासुन सुधारित घरभाडे भत्ता ( HRA ) ;  वित्त विभागाचा GR .

Spread the love

E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra employee sudharit gharabhade bhtta shasan nirnay ] : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्तावर आधारित घरभाडे भत्ता लागु करणेबाबत , राज्य शासनांच्या वित्त विभाग मार्फत दिनांक 05.02.2024 रोजी महत्वपुर्ण जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे .

केंद्र शासनांच्या 7 व्या वेतन आयोगामधील शिफारशीप्रमाणे केंद्र शासनांच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आलेल्या वेतन मॅट्रीक्स व वेतन स्तर या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारित वेतन ) नियम 2019 नुसार वेतन मॅट्रीक्स व वेतन स्तर लागु करण्यात आलेला आहे .

त्याचबरोबर केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाच्या घरभाडे भत्त्यांच्या दरांमध्ये केंद्र शासनांच्या दिनांक 07 जुलै 2017 च्या ज्ञापनानुसार झालेली सुधारणा विचारात घेवून राज्यातील सरकारी कर्मचारी व इतर पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शहरे व गावांच्या सुधारित पुनर्वर्गीकरण विचारात घेवून 7 व्या वेतन आयोगाच्या कालावधीमध्ये सुधारित घरभाडे लागु करण्याच्या प्रश्नांच्या अनुसरुन पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे .

हे पण वाचा : जुनी पेन्शन, निवृत्तीचे वय, आश्वासित प्रगती योजना ,सुधारित वेतन ,आगाऊ वेतन इ.22 मागणी करिता महासंघाकडून प्रसिद्धीपत्रक..

वित्त विभागाच्या सदर शासन निर्णयानुसार दिनांक 01.01.2019 पासुन सुधारित घरभाडे भत्ता लागु करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे , ज्यावेळी सातवा वेतन आयोगांमध्ये महागाई भत्ताचे दर हे 50 टक्क्यापेक्षा अधिक होईल त्यावेळी घरभाडे भत्ता मध्ये वर्गीकृत करण्यात आलेल्या शहर / गावांना अनुक्रमे 30 टक्के , 20 टक्के , 10 टक्के अशी वाढीव दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

अ.क्रशहरांचे / गावांचे वर्गीकरणसुधारित घरभाडे भत्ता ( नियोजित )
01. X30%
02.Y20%
03Z10%

माहे जुलै 2024 मिळणार फरकासह घरभाडे भत्ता : राज्यातील सरकारी व इतर पात्र कर्मऱ्यांना सध्या स्थितीमध्ये माहे जानेवारी 2024 पासुन 50 टक्के दराने घरभाडे भत्ता देण्यात येतो , तर जुलै 2024 मध्ये परत 3 टक्के डी.ए वाढ नियोजित आहे , म्हणजेच डी.ए चा आकडा 50 टक्के पेक्षा अधिक होईल , म्हणजेच राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2024 पासुन फरकास घरभाडे भत्ता देण्यात येईल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment