लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे वितरण ; तसेच अर्ज करण्यास मदत वाढ , जाणून घ्या मोठी अपडेट !

Spread the love

E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ ladaki bahin yojna second installment & mudatvadh ] : लाडकी बहीण योजना अंतर्गत अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे . त्याचबरोबर सदर योजने अंतर्गत अर्ज करण्याने देखील मदत वाढ देण्यात आली आहे . या संदर्भातील माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमांमध्ये माहिती दिली आहे .

काल दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे लाभ वितरण कार्यक्रमांमध्ये देण्यात आले आहे . पहिल्या टप्प्यामध्ये लाडकी बहीण योजना अंतर्गत एक कोटी 60 लाख बहिणीच्या खात्यामध्ये 3 हजार 225 कोटी इतकी रक्कम बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे . तर काल दिनांक 31 ऑगस्ट रोजी सदर योजना अंतर्गत तब्बल 52 लाख बहिणीच्या खात्यामध्ये 1562 कोटी रूपये इतक्या रकमेचे वितरण करण्यात आले आहेत .

आतापर्यंत एकूण 01 कोटी 60 लाख लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना प्रत्यक्ष लाभ प्राप्त झाला आहे . सदर योजनेमुळे राज्यातील सर्वसामान्य , गरीब महिलांना मोठा लाभ प्राप्त झालेला आहे . सदर योजना पुढेही कार्यरत राहील असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर कार्यक्रमादरम्यान दिले आहे .

सदर कार्यक्रमादरम्यान देशाचे पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून लखपती दीदी योजना अंतर्गत राज्यातील तब्बल 50 लाखाहून अधिक महिलांना लखपती केले जात असल्याचे मुख्यमंत्री यांनी नमूद केली आहे . त्याचबरोबर मुलींना उच्च शिक्षण घेता यावे याकरिता शिक्षण क्षेत्रामध्ये पूर्णपणे सवलत दिल्याचा निर्णय घेतला आहे .

हे पण वाचा : दहावी व बारावी मध्ये 60% पेक्षा अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांना 51 हजार रुपयांची आर्थिक मदत !

अर्जास मुदतवाढ : सदर योजना अंतर्गत ज्यांचे अर्ज रद्द झाले आहेत अशांना पुन्हा अर्ज सादर करण्यासाठी सप्टेंबर महिन्यामध्ये मुदत दिली जाणार असल्याची माहिती सदर कार्यक्रम दरम्यान महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे .

शेतकऱ्यांनो नियमित हवामान अंदाज कृषी विषयक माहिती योजना यांची रेग्युलर  अपडेट साठी खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !.

Leave a Comment