लाडकी बहीण योजना बाबत आत्ताची मोठी अपडेट ; मंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती !

Spread the love

E- marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ ladaki bahin yojna latest new update news ] : राज्य शासनाकडून लाडकी बहीण योजना अंतर्गत अर्ज करण्यास सप्टेंबर महिन्यामध्ये देखील मुदत वाढ देण्यात आली आहे . यामुळे राज्यातील पात्र महिलांना सदर योजने अंतर्गत सप्टेंबर महिन्यापर्यंत अर्ज करता येणार आहेत . परंतु नव्याने अर्ज करणाऱ्या महिलांना सदर योजना अंतर्गत केवळ त्याच महिन्याकरिता पैसे मिळणार आहेत .

सदर योजना अंतर्गत महिलांना जुलै महिन्यापासून पैसे मिळत आहे . परंतु ज्या महिला एक सप्टेंबर पासून अर्ज करणार आहेत अशा लाडक्या बहिणींना केवळ सप्टेंबर महिन्यापासूनच पुढे पैसे मिळत राहणार आहेत . तर ज्या महिलांनी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर केले आहेत अशा महिलांना जुलै पासूनच पैसे मिळणार आहेत . म्हणजेच ज्यांनी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर केले आहेत अशांना 4500/- रुपये मिळणार आहेत .

सप्टेंबर मध्ये अर्ज करणाऱ्यांना 1500/- रुपये : ज्या महिला सप्टेंबर महिन्यात अर्ज करतील त्यांना केवळ सप्टेंबर महिन्यापासूनच सदर योजना अंतर्गत प्रतिमहा 1500/- रुपये दिले जाणार आहेत . कारण अर्ज करण्याची शेवटची मुदत 31 ऑगस्ट अशी होती .

हे पण वाचा : पुणे महानगरपालिका मध्ये तब्बल 681 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया ; अर्ज करायला विसरू नका !

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे माहिती गडचिरोली येथे आयोजित एका कार्यक्रमांमध्ये माहिती देताना सांगितले की , ज्या महिलांनी दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर केले आहेत, अशांना मागील दोन महिन्यांचा लाभ मिळणार आहे तर एक सप्टेंबर पासून अर्ज करणाऱ्यांना मागील दोन महिन्याचा हप्ता मिळणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे .

अर्ज प्रक्रिया सुरूच : सदर योजना अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू असून , ज्यांनी अद्याप पर्यंत अर्ज सादर केले नाहीत अशांनी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करण्याची आव्हान राज्य सरकारकडून करण्यात आली आहे .

शेतकऱ्यांनो नियमित हवामान अंदाज कृषी विषयक माहिती योजना यांची रेग्युलर  अपडेट साठी खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !.

Leave a Comment