E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ ladaki bahin yojna enable for DBT STATUS] : लाडकी बहीण योजने अंतर्गत दिनांक 31 जुलै पूर्वी अर्ज केलेल्या लाडके बहिणींना 3000/- रुपये बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आले आहेत .अशा बहिणीची एकूण संख्या 80 लाख इतकी आहे . तर उर्वरित 31 जुलै नंतर अर्ज केलेल्या लाडकी बहीणना सदर योजना अंतर्गत अनुदानाचा दुसरा टप्पा वितरित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे . तर ज्यांना सदर योजनेअंतर्गत पैसे मिळाले नाहीत अशांनी आपले आधार व बँक STATUS चेक करून घ्यायचे आहेत .
परंतु सदर लाडकी बहीण योजना अंतर्गत आधार प्रणालीचे डीबीटी Enable नसेल तर सदर योजना अंतर्गत आपल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत, याकरिता आपण आपल्या मोबाईलवरून सदर स्टेटस Enable आहे की नाही पाहू शकतो. याकरिता पुढील पद्धतीने सदस्य स्टेटस चेक करता येईल .
सर्वप्रथम गुगल वर जाऊन https://www.npci.org.in/ या वेबसाईटवर क्लिक करावे . सदर लिंक वर सर्वप्रथम Consumer या ऑप्शनवर क्लिक करावेत , त्यानंतर Bharat Aadhaar Seeding Enabler (BASE) या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे , त्यानंतर Request for aadhar seeding या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे . त्यामध्ये Get Aadhaar Mapped Status या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे .
हे पण वाचा : लाईफकेअर लिमिटेड मध्ये विविध पदांच्या तब्बल 1121+ जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
त्यानंतर त्या ठिकाणी आपले आधार नंबर व कॅपच्या टाकून चेक स्टेटस वर क्लिक करायचे आहे . चेक स्टेटस वर क्लिक केल्यानंतर , आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येइल तो टाकून सबमिट केल्यानंतर , आधारचे स्टेटस दिसेल .
सदर आधार स्टेटस मध्ये मॅपिंग स्टेटस ( Mapping Status ) : Enabled for DBT असेच असणे आवश्यक असणार आहे , त्याचबरोबर सदर योजनेअंतर्गत आपल्या कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत त्या बँकेचे नाव देखील दिसणार आहेत . जर सदर स्टेटस दिसत नसेल तर बँकेमध्ये जाऊन सदर ऑप्शन Ebable करून घ्यायचे आहेत .
शेतकऱ्यांनो नियमित हवामान अंदाज कृषी विषयक माहिती योजना यांची रेग्युलर अपडेट साठी खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !.
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.16.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !
- राज्यात या 11 दिवशी पडणार मुसळधार पाऊस ; ” या” जिल्ह्यांना अलर्ट जारी – पंजाबराव यांचा नवा हवामान अंदाज ..
- दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असताना निधन झालेल्या / होणाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सुधारित करणेबाबत महत्वपुर्ण GR .
- पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार बातमीबाबत , राज्य शासनांकडून खुलासा !
- राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ; सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ..