लाडकी बहीण योजना बाबत आत्ताची मोठी अपडेट ; रद्द झालेले अर्ज त्रुटी पुर्तता करुन Resubmit करण्यासाठी मदतकक्ष ..

Spread the love

E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Ladaki bahin yojana ] : लाडकी बहीण योजना अंतर्गत रद्द झालेले अर्जांच्या त्रुटीची पुर्तता करुन परत रिसबमिट करण्यासाठी मदतकक्षाच्या माध्यमातुन लाभ देणेबाबत , राज्य शासनांकडून महत्वपुर्ण माहिती देण्यात आलेली आहे .

लाडकी बहीण योजना अंतर्गत अनेक लाभार्थ्यांचे अर्ज अंशत : त्रुटींमुळे रद्द करण्यात आलेले आहेत . सदर त्रुटींचे अर्ज ऑनलाईन माध्यमातुन  योग्य त्या दुरुस्त्यासह परत सबमिट करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत , याकरीता राज्य शासनांकडून मदतकक्ष स्थापित करण्यात आलेले आहेत .

अशा प्रकारचे रद्द झालेले अर्ज नारीशक्ती दुत मोबाईल ॲपवर जावून View Reason या टॅबवर क्लिक करुन सदर कागदपत्रांची पुर्तता करुन Edit Form या टॅबवर जावून दुरुस्त्या करुन अर्ज परत सबमिट करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . सदरचा फॉर्म हा फक्त एकदाचा Edit करता येईल याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

यामुळे ज्यांना सदर योजना अंतर्गत पैसे मिळाले नाहीत , अशा महिलांनी आपल्या अंगणवाडी सेविका , आशा वर्कर , ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधुन आपल्या अर्जाची तपासुन , त्रुटी असल्यास त्रुटीचे निवारण करावेत .

हे पण वाचा : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 1027 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..

यामुळे सदर योजना अंतर्गत ज्यांचे अर्ज काही कागदपत्रांच्या त्रुटी  अभावी रद्द झालेले आहेत , अशांना देखिल त्रुटी पुर्तता करण्यासाठी पोर्टल / नारीदुत ॲप्सवर टॅब उपलब्ध करुन देण्यात आला आहे .

यामुळे ज्यांची त्रुटी आहेत , अशांनी तात्काळ पुन्हा अर्ज सादर करण्याची विनंती करण्यात आली आहे , जेणेकरुन पात्र महीलांना आर्थिक लाभ देण्यास मदत होईल , असे प्रशासनांकडून जाहीर करण्यात आले आहेत .




Leave a Comment