नोकरी करणाऱ्या महिलांचे लैंगिक शोषण तसेच अत्याचार रोखणेबाबत , सरकारकडून नविन कायदा .

Spread the love

E-marathipeapr संगिता पवार प्रतिनिधी [ Job women protection new Rules ] : नोकरी करणाऱ्या महिलांचे लैंगिक शोषण व अत्याचार रोखणेबाबत  , शासनांकडून नविन कायद्याची निर्मिती करण्यात आलेली आहे , सदर कायद्यांमध्ये जबर गुन्हा करणाऱ्यांसाठी फाशीची शिक्षा देण्यापर्यंतची तरतुद नमुद करण्यात आलेली आहे .

राज्यातील महिला व बालकांवर अत्याचार व लैंगिक शोषण वाढत चालले आहेत , ही बाब लक्षात घेवून राज्य शासनांकडून तातडीने कायही उपाययोजना करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून दिनांक 01.07.2024 पासुन नविन कायद्यांची अमलबजावणी करण्यात येत आहेत . या कायद्यांमध्ये महिलांवर तसेच बालकांवरील अत्याचाराच्या गंभीर गुन्हांमध्ये कडक शिक्षेची तरतुद करण्यात आलेली आहे .

केंद्र सरकारच्या IPC 1860 , फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व भारतीय पुरावा कायदा 1972 नुसार आयपीसी 2023 , भारतीय नागरी संरक्षण संहिता कायदा 2023 अंमलात आणण्यात आलेला आहे . या सर्व नविन कायद्यांची अंमलबजावणी दिनांक 01.07.2024 पासुन करण्यात येत आहेत .

यांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांवरील लैंगिक शोषण व अत्याचारास कायद्याच्या चौकटीत : यांमध्ये प्रामुख्याने ज्या महिला / मुली नोकरी करीत आहेत , अशा महिलांना नोकरी करीत असताना एखाद्या व्यक्तीने लग्न करण्याचे , नोकरीमध्ये प्रमोशन अथवा नोकरी देण्याचे खोटे आश्वासन देवून सदर महिलेसोबात लैंगिक संबंध ठेवल्याच्या गुन्ह्यांना सदर नविन कायद्यांमध्ये गुन्हापात्र तरतुद करण्यात आलेली आहे .

तसेच कामाच्या ठिकाणी प्रमोशनच्या बदल्यात महिलांकडे लैंगिक सुखाची मागणी केल्यास , सदर नविन कायद्यानुसार जलद न्याय मिळावा याकरीता , सदर गुन्ह्यातील शिक्षेत 10 वर्षापर्यंतच्या कारावासाची व दंडदेखिल होवू शकतो . तसेच 18 वर्षाखालील मुलींवर सामुहिक बलात्कार हा प्रत्येक व्यक्तीने गुन्हा केल्याचे समजले जाईल , व सदर गुन्ह्यांमध्ये जन्मठेपेची शिक्षा नमुद होती  , आता यांमध्ये सुधारणा करुन आता ती फाशीच्या शिक्षेत रुपांतरीत करण्यात आली आहे .

त्याचबरोबर एखाद्या महिलेचे खासगी संभाषण ऐकणे  , तिचे कपडे बदलताना पाहीणे अथवा फोटो काढणे , तिचे खाजगी कृत्य पाहणे व कोणी प्रसारित केले तर त्यास दोषी ठरवुन 01 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल . तर गुन्हांनुसार 03 वर्षांपर्यंत वाढवता येईल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment